एसटी : आपसी कर्तव्य बदलाला लगाम; लाडक्या कर्मचाऱ्यांची तारांबळ file photo
छत्रपती संभाजीनगर

एसटी : आपसी कर्तव्य बदलाला लगाम; लाडक्या कर्मचाऱ्यांची तारांबळ

चालक-वाहकांच्या परस्पर ड्युटी बदलल्यामुळे कामाचे तास, विश्रांतीचे नियम आणि अपघातासारख्या गंभीर प्रसंगी जबाबदारी निश्चित करण्यात अडथळे निर्माण होतात.

पुढारी वृत्तसेवा

It is mandatory for ST (State Transport) drivers and conductors to perform the duties assigned to them

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या चालक-वाहकांना नेमून दिलेले कर्तव्य (ड्युटी) पार पाडणे बंधनकारक असतानाही अनेक आगारांमध्ये चालक-वाहक दररोज संगनमताने आणि परस्पर आपसी समझोत्यातून ड्युट्यांची अदलाबदल करत असल्याच्या प्रकारांचे दैनिक पुढारीने १४ ऑक्टोबरच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच अधिकारी खडबडून जागे झाले असून त्यांनी गुरुवार (दि. १५) पासून या प्रकाराला लगाम लावला आहे. यामुळे लाडक्या चालक-वाहकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.

चालक-वाहकांच्या परस्पर ड्युटी बदलल्यामुळे कामाचे तास, विश्रांतीचे नियम आणि अपघातासारख्या गंभीर प्रसंगी जबाबदारी निश्चित करण्यात अडथळे निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन वरिष्ठ कार्यालयाने अशा प्रकारे कर्तव्ये बदलणाऱ्या चालक-वाहकांवर तसेच त्यांना मूकसंमती देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे परिपत्रक जारी केले होते.

मात्र, याला बगल देत हा प्रकार सुरूच होता. यामुळे नियमांनुसार काम करणाऱ्यांना मात्र त्रास सहन करावा लागत होता. कर्तव्य बदलांवर लागाम लावल्यामुळे आगारात एकच खळबळ उडाली आहे. अधिकारी यावर नियमित लक्ष ठेवणार असून, याचे काटेकोर पालन होईल यासाठी ते प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लाडक्यांची तारांबळ

मर्जीतील संबंधांमुळे ठराविक चालक-वाहक हव्या त्या सोयीच्या, कमी अंतराच्या किंवा स्थानिक फेऱ्या परस्पर आपसी कर्तव्य बदलून घेत होते. गुरुवारपासून यावर निर्बंध आणल्यामुळे अधिकाऱ्यांच्या जवळचे किंवा लाडक्या चालक-वाहकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. यावर पळवाट शोधण्यासाठी अनेक जण सरसावले असल्याचे आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या मागोव्यातून समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT