CCTV Camera :गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवा file photo
छत्रपती संभाजीनगर

CCTV camera :गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवा

एसपी डॉ. विनयकुमार राठोड; पैठण येथे पोलिस पाटलांशी संवाद

पुढारी वृत्तसेवा

Install CCTV cameras to control crime.

पैठण, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावपातळीवर गुन्हेगारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक असून यामुळे पोलिस यंत्रणाच्या तपासाला गती मिळून तक्रारदारांचे तत्काळ समाधान होईल असे मत ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांनी शनिवारी २८ रोजी पैठण पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक तपासणी व पोलिस पाटील सुसंवाद कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामकाजाचा अहवाल सादर केला. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी पोलिस कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन पोलिस पाटील यांच्याशी सुसंवाद साधला. यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

याप्रसंगी सपोनि चंद्रकांत पवार, जनाबाई सांगळे, उपनिरीक्षक संभाजी खाडे, ऋषिकेश तळेकर, वैभव सारंग, प्रमोद यादव, अजीज शेख, गोपनीय शाखेचे लक्ष्मण पुरी, पाटेकर, नरेंद्र अंधारे, राजेश आटोळे, विष्णू गायके, रावसाहेब आव्हाड, भाऊसाहेब तांबे, कल्याण ढाकणे, कृष्णा दुबाले, अंकुश शिंदे, मुजू पठाण, राहुल बल्लाळ, विलास सुखधान, सुनिता चेके, कृष्णाई शिंदे, अनिता गांगुर्डे, माधुरी चव्हाण, सविता साळुंखे, कोमल कोतकर, भगवान धांडे, संतोष तोडकर, अरुण जाधव, दांडगे इत्यादी पोलिस कर्मचारी व पोलिस पाटीले उपस्थित होते.

सीसीव्हीमुळे तपास कार्यात मदत

प्रत्येक गावातील शैक्षणिक संस्था, शाळा महाविद्यालय, आरोग्य व्यवस्था, विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या यासह संबंधित गावाच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रयत्न करावा, या कॅमेऱ्यामुळे गुन्-हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच पोलिस प्रशासनाला तपास कामात मोठे सहकार्य मिळून तक्रारदारांना तात्काळ न्याय देण्याचे काम जलद गतीने होण्यास मदत मिळेल. असे राठोड यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT