Zilla Parishad schools : जिल्हा परिषद शाळांची सोमवारपासून तपासणी मोहीम File Photo
छत्रपती संभाजीनगर

Zilla Parishad schools : जिल्हा परिषद शाळांची सोमवारपासून तपासणी मोहीम

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Inspection campaign of Zilla Parishad schools from Monday

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम सोमवार, १८ ते ३० मे या कालावधीत राबविली जाणार आहे. शाळांच्या भौतिक आणि शैक्षणिक गरजांचा आढावा घेणे हा या मोहिमेचा हेतू आहे. तपासणी मोहिमेसाठी त्रिसदस्यीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शंभर टक्के शाळांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तपासणीवेळी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित राहून पथकास आवश्यक ती माहिती पुरवून सहकार्य करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. या मोहिमेचा सविस्तर अहवाल ५ जूनपर्यंत जिल्हा परिषद कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.

तपासणी पथकांमध्ये पथक प्रमुख, सहायक आणि एक त्रयस्थ केंद्रप्रमुख यांचा समावेश असेल. हे पथक केंद्रांतर्गत येणाऱ्या प्रत्येक शाळेला भेट देऊन सविस्तर अहवाल तयार करावा लागणार आहे. तपासणी दरम्यान शाळांमधील भौतिक सुविधा जसे की, शाळेची इमारत, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची स्थिती. अभिलेख तपासणी, मध्यान्ह भोजन योजना आणि इतर शैक्षणिक योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, तसेच पायाभूत सुविधा तपासल्या जाणार आहे.

जिल्ह्यात सोमवारपासून जिल्हा परिषद शाळांच्या तपासणीची मोहिम राबविली जाणार आहे. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी ही विशेष मोहीम आखली आहे. भविष्यातील शैक्षणिक नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT