Sambhajinagar Crime News : मंगळसूत्र चोर, तोतये पडले पोलिसांवर भारी  File photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : मंगळसूत्र चोर, तोतये पडले पोलिसांवर भारी

सहा महिन्यांत १४ जणांना लुबाडले, एकही सापडेना; चेन स्नॅचिंगच्या ३४ घटनांपैकी ८ उघड

पुढारी वृत्तसेवा

Increase in chain snatching incidents in Chhatrapati Sambhajinagar city, a challenge for the police

प्रमोद अडसुळे

छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळसूत्र चोर, तोतया पोलिसांनी धुमाकूळ घातला असून, गेल्या सहा महिन्यांत १४ जणांना लुबाडून लाखोंचा ऐवज तोतयांनी लुबाडून नेला. यातील एकालाही पोलिस पकडू शकले नाहीत. दुसरीकडे महिलांच्या दागिन्यांवर हात टाकून ३४ जणींचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरांनी हिसकावले. मात्र पोलिसांना केवळ ८ गुन्हे उघड करता आले. त्यामुळे खऱ्या पोलिसांवर तोतये, मंगळसूत्र चोर भारी पडल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून गस्त वाढवली जात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात या टोळ्यांचे मनोधैर्य अधिकच वाढल्याचे दिसते.

शहरातील स्ट्रीट क्राईम रोखण्यात पोलिसांना सपशेल अपयश येताना दिसत आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरी, घरफोडी, लूटमार, मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्यातच तोतया पोलिसांनी देखील खऱ्या पोलिसांना थेट आव्हान देत सहा महिन्यात १४ जणांना लुबाडून लाखोंचा ऐवज लंपास केला. यातील एकही तोतया खऱ्या पोलिसांना सापडलेला नाही हे विशेष. दुसरीकडे रस्त्यावर चालणाऱ्या गळ्यातील महिलांच्या दागिने हिसकावणाऱ्या टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. ३४ महिलांचे दागिने ओरबाडून नेले. यातील केवळ ८ गुन्हे पोलिसांना उघड करता आहे. गुन्हे शाखा, पोलिस ठाण्याच्या डीबी पथक करते काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

जवाहरनगर चोरांचा हॉटस्पॉट

जवाहर नगर भागाला तोतया पोलिस आणि मंगळसूत्र चोरांनी टार्गेट केले आहे. सहा महिन्यात ८ मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या. यातील केवळ दोन गुन्हे उघड झाले. तर चार जणांना तोतयाच्या टोळीने लुबाडले. यातील एकही पोलिसांच्या हाती लागला नाही. बेगमपुरा, दौलताबाद, एमआयडीसी वाळूज, वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकही मंगळसूत्र चोरी किंवा तोतयागिरीचा गुन्हा घडला नाही.

स्ट्रीट क्राईम ठरतेय डोकेदुखी

शहरात रस्त्यावर गुंड, मवाली, सराईत गुन्हेगार, नशेखोर लूटमार करून नागरिकांवर हल्ले करतात. अनेक घटनांमध्ये तेच ते आरोपी निष्पन्न होऊनही पोलिसांकडून अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पायबंद घालण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. स्ट्रीट क्राईम रोखण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत. दुसरीकडे लाखो रुपये खर्चुन स्मार्ट सिटीतुन बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कालबाह्य झालेत. महत्वाचे रस्ते, चौकांमध्ये नवीन एचडी, नाईट व्हिजनचे कॅमेरे बसविण्याची गरज आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा माग काढणे पोलिसांना सोपे जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT