Income tax notice to Minister Shirsat
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विट्स हॉटेलच्या खरेदीमुळे वादात सापडलेले शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. पाच वर्षांत तुमच्या संपत्तीत इतकी वाढ कशी झाली ? अशी विचारणा या नोटीसद्वारे करण्यात आली आहे. उत्तर देण्यासाठी शिरसाट यांना ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु त्यांनी ही मुदत वाढवून मागितली आहे.
छत्रपती संभाजीनगर आयोजित चार्टर्ड अकाऊंटंटसच्या कार्यक्रमात बोलताना खुद्द मंत्री संजय शिरसाट यांनीच ही माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून संजय शिरसाट यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप होत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्सचा प्रशासनाकडून लिलाव करण्यात आला होता.
त्यात शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीने सर्वाधिक बोली लावली. मात्र बाजारभावाने ११० कोटींचे हे हॉटेल ६५ कोटींत विकल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी मंत्री शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर शिरसाट यांनी या लिलावातून माघार घेतली. हे प्रकरण ताजे असताना त्यांच्यावर वर्ग २ ची जमीन नियमबाह्यपणे खरेदी केल्याचा आर-ोपही झाला. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर इतरही अनेक घोटाळ्यांचे आरोप शिरसाटांची संपत्ती किती वाढली ?
निवडणूक शपथपत्रानुसार, सन २०१९ मध्ये शिरसाट यांची संपत्ती १ कोटी २१ लाख रुपये होती. ती सन २०२४ मध्ये १३ कोटी ३७लाख रुपये झाली. त्यांची स्थावर संपत्ती २०१९ मध्ये १ कोटी २४ लाख रुपये होती. ती २०२४ मध्ये १९ कोटी ६५ लाख रुपये झाली. सन २०१९ मध्ये त्यांच्याकडे १६ कोटी रुपये किमतीचे सोने होते. सन २०२४ मध्ये १ कोटी ४२ लाख रुपये किमतीचे दागिने असल्याचे नमूद केले होते.
तसेच त्यांनी शिरसाट यांची इन्कम टॅक्स विभागाकडे तक्रारही केली होती. त्यानंतर त्यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इन्कम टॅक्सने नोटीस बजावल्याची बाब खुद्द शिरसाट यांनीच एका कार्यक्रमात जाहीर केली. आयकर विभाग त्यांचे काम करत आहे. सन २०१९ च्या निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती, सन २०२४ च्या निवडणुकीवेळी तुमची संपत्ती एवढी कशी वाढली, अशी विचारणा त्यांनी केली आहे. त्यांनी केवळ स्पष्टीकरण मागितले आहे. उत्तरासाठी मला ९ तारखेपर्यंत वेळ दिला होता. मी निश्चितपणे कायदेशीर उत्तर देणार आहे. त्यासाठी वेळ वाढवून मागितला आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.
चार्टर्ड अकाऊंटंटसच्या कार्यक्रमात शिरसाट यांनी इन्कम टॅक्सच्या नोटीसबद्दल व्यक्तव्य केले. यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत. हे मी माझ्यासाठी बोललो आहे, कारण खरेच मला इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे. तुमची संपत्ती एवढी कशी झाली, अशी विचारणा त्यांनी केली. आजच्या काळात पैसे कमावणे सोपे आहे, पण त्याची विल्हेवाट लावणे अवघड झाले आहे, असेही शिरसाट या कार्यक्रमात म्हणाले होते.
इन्कम टॅक्सने शिरसाट यांना नोटीस बजावली आहे. आता इतर एजन्सींनी म्हणजे ईडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही त्यांचे काम केले पाहिजे. हॉटेल विट्सचे प्रकरण आहे. कशा पद्धतीने अडीच कोटींची गाडी दुबईहून दुसऱ्या माणसाच्या नावे इथे आणली. जालना रोडवर २५ कोटींची मालमत्ता कशी ५ कोटींत खरेदी केली, वर्ग २ ची जागा मुलाच्या नावावर करून घेतली, अशी अनेक प्रकरणे आहेत. जेव्हा प्रशासन, पोलिस, नेत्यांची गुलामी करतात, तेव्हा असे प्रकार घडतात.