In the rush for cheap clothes, a stampede-like situation occurred in the store
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आकाशवाणी येथील फ्रिडम टॉवरमध्ये एका नवीन कपड्याच्या दुकानाचे रविवारी (दि.४) उद्घाटन झाले. या दुकानाने किरकोळ दरात कपडे विकणार असल्याचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
या जाहिरातीला भुलून केवळ शहरातीलच नव्हे, तर जालना, वाशीम, परभणी आणि नांदेड यासारख्या दूरच्या जिल्ह्यांतूनही शेकडो महिला सकाळीच दुकानासमोर जमा झाल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास दुकानाचे शटर उघडताच झुंबड उडाली.
दुकानाला प्रवेशासाठी केवळ एकच शटर असल्याने आणि आतमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक घुसल्याने श्वास घेणेही कठीण झाले. प्रत्येक वस्तू मिळवण्यासाठी ग्राहकांची ओढाताण सुरू झाली. या गर्दीत प्रचंड उकाडा आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तीन महिलांना चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या.