स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्यापुढे भाजपचे राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, एमआयएमचे नगरसेवक अब्दुल मतीन खान, अजहर पठाण एकमेकांवर आगपाखड करताना. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Imtiaz Jaleel |इम्तियाज जलील यांना कचऱ्याच्या कंत्राटदाराला ब्लॅकमेल कराचे का?

भाजप-एमआयएमध्ये जुंपली, सभापतींनी दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : हडको एन-१२ येथील कचरा संकलन केंद्र २०१८ सालापासून सुरू आहे. असे असताना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे आताच या केंद्राला विरोध का करीत आहेत. त्यांना कचरा संकलनाचे काम करणाऱ्या नव्या कंत्राटदारा ब्लॅकमेल करायचे का, असा सवाल भाजपचे सदस्य राजगौरव वानखेडे यांनी सोमवारी (दि. १३) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला. त्यावरून एमआयएमचे सदस्य संतापले. अखेर भाजप-एमआयएममध्ये शाब्दिक युद्ध सुरू असताना सभापती अनिल मकरिये यांनी २४ तासांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांना दिले.

महापालिकेची दुसरी स्थायी समिती सभा सोमवारी पार पडली. या सभेत शहरातील २० हून अधिक विकासकामांचा समावेश होता. सभा सुरू होताच कचरा संकलन केंद्रावरून भाजप-एमआयएममध्ये जुंपली. भाजप नगरसेवक राज वानखडे यांनी हडको एन-१२ येथील प्राथमिक कचरा संकलन केंद्राचा मुद्दा उपस्थित केला. कचरा संकलन केंद्रातील एमआयएमच्या आंदोलनाला परवानगी होती का, या आंदोलनमुळे कचरा संकलनाचे काम थांबले होते का, याचा खुलासा व्हावा, अशी मागणी केली. त्यावर खुलासा करीत उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी काम थांबले होते, असे सांगितले. तर कर्तव्य पार पाडताना महापालिकेच्या कामकाजात कोणी अडथळा निर्माण केल्यास शासकीय कामात अडथळा केला, या कारणावरून गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असे विधी सल्लागार तथा उपायुक्त अँड अपर्णा थेटे यांनी सभेत सांगितले. या आंदोलकांवर आतापर्यंत गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल वानखेडे यांनी उपस्थित केला.

एमआयएमचे नगरसेवक प्रशासनावर दादागिरीच्या रिल्स तयार करून त्या सोशल मीडियावर टाकतात. विरोधी पक्षनेत्यांची त्या रिल्समधील भाषा योग्य आहे का, अशी दादागिरी खपवून घेणार नाही. याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही वानखेडे यांनी केली. जे कचरा संकलन केंद्र २०१८ पासून सुरू आहे, त्याविरोधात एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षांनी केंद्रावर जाऊन आताच का आंदोलन केले. महापालिकेत त्यांचे नगरसेवक आहेत. त्यांच्यामार्फत यावर सभांमध्ये विषय मांडता आला असता. तरीही असे आंदोलन का, जलील यांना नव्या कंत्राटदाराला ब्लॅकमेल करायचे आहे का, असा सवालही वानखेडेंनी उपस्थित केला. त्यावरून एमआयएमचे

नगरसेवक अब्दुल मतीन खान, अजहर पठाण अक्रमक झाले. जनतेची समस्या सोडविण्यासाठी ते कचरा संकलन केंद्रात गेले होते. सतत त्यांचे नाव घेण्याची गरज नाही, त्यांनी आरेरावी केली नाही, असे म्हणत भाजप नगरसेवकांच्या वक्तव्यावर त्यांनी आक्षेप घेतला. मात्र ही शाब्दिक चकमक सुरू असतानाच सभापती मकरिये यांनी २४ तासांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

कचरा संकलन केंद्र २०१८ पासून सुरू आहे, त्याविरोधात एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षांनी केंद्रावर जाऊन आताच का आंदोलन केले. महापालिकेत त्यांचे नगरसेवक आहेत. त्यांच्यामार्फत यावर सभांमध्ये विषय मांडता आला असता. तरीही असे आंदोलन का, जलील यांना नव्या कंत्राटदाराला ब्लॅकमेल करायचे आहे का, असा सवालही वानखेडेंनी उपस्थित केला. त्यावरून एमआयएमचे नगरसेवक अब्दुल मतीन खान, अजहर पठाण अक्रमक झाले. जनतेची समस्या सोडविण्यासाठी ते कचरा संकलन केंद्रात गेले होते. सतत त्यांचे नाव घेण्याची गरज नाही, त्यांनी आरेरावी केली नाही, असे म्हणत भाजप नगरसेवकांच्या वक्तव्यावर त्यांनी आक्षेप घेतला. मात्र ही शाब्दिक चकमक सुरू असतानाच सभापती मकरिये यांनी २४ तासांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

संकलन केंद्रही सहन होईना महापालिकेने पडेगाव-भावसिंगपुरा, हसूल, चिकलठाणा, कांचनवाडी येथे कचरा डेपो उभारले आहेत. संपूर्ण शहराचा कचरा या डेपोत टाकला जातो. ज्या भागात हे डेपो आहेत, तेथील सुमारे तीन चौरस किलोमीटर अंतरातील रहिवाशांनी स्वतःची घरे कवडीमोल किमतीत विकून निघून गेलेत. काही जण दुर्गंधी सहन करीत तेथेच राहताय. मात्र एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना स्वतःच्या घर-ाजवळ साधे कचरा संकलन केंद्रही सहन होईना.

अहवाल येताच कारवाई

आयुक्त अमोल येडगे यांनी खुलासा करताना सांगितले की, हे काम थांबणार नाही. उपायुक्तांकडून अहवाल आल्यानंतर लगेच कारवाई केली जाईल. महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणीच दबाव आणू नयेत. समस्या, प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT