Illegal Tree Cutting : अवैध वृक्षतोडीचा मुद्देमाल जप्त file photo
छत्रपती संभाजीनगर

Illegal Tree Cutting : अवैध वृक्षतोडीचा मुद्देमाल जप्त

विनापरवाना वाहतूक करणारे ट्रॅक्टर वनविभागाच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Illegal tree felling material seized

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिशोर-कन्नड रस्त्यावरील मौजे मेहगाव येथे अवैध वृक्षतोड करून शिरस प्रजातीचे लाकूड विनापरवाना वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर वनविभागाने कारवाई केली.

ही कारवाई शनिवारी (दि.२२) रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. पिशोर-कन्नड रोडवरील मौजे मेहगाव परिसरात वनविभागाच्या पथकाला एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर शिरस प्रजातीच्या अवैध वृक्षतोडीचा मुद्देमाल भरून विनापरवाना वाहतूक करताना आढळून आला. वनविभागाच्या पथकाने तत्काळ ट्रॅक्टर ताब्यात घेतला.

याप्रकरणी वनगुन्हा नोंदविण्यात आला असून, जप्त केलेल्या मुद्देमालाबाबत पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, सहायक वनसंरक्षक विशाल कवडे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, कन्नड, शिवाजी टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपाल पिशोर रफिक पठाण, वनरक्षक हस्ता कृष्ण माळी, वनरक्षक बाळू चव्हाण आणि वनरक्षक भारंबा श्रीमती अश्विनी लांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल रफिक पठाण करीत आहेत. वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड व विनापरवाना लाकूड वाहतुकीविरुद्ध वनविभागाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT