Husband sets house on fire for alcohol; also torches maize stack
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा: पत्नीने पतीला दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात पतीने पत्नीला बेदम मारहाण करून स्वतःचे घर जाळले व शेतातील मकाच्या गंजीला आग लावली. तालुक्यातील पिंपळगावपेठ येथील गणेशवाडी शिवारात ही घटना मंगळवारी (दि.१०) रात्री घडली.
या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्वताबाई सुदाम दुधे (३८, रा. पिपळगावपेठ गणेशवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती सुदाम शामराव दुधे (रा. पिपळगावपेठ गणेशवाडी) याच्याविरुध्द बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. यात संसारोपयोगी साहित्य आणि शेतातील जवळपास १०० क्विटल मका असा लाखोंचा ऐवज जळून खाक झाला आहे.