Sambhajinagar News : हॉटेल चालकांकडून बॅनरवर एसटीच्या लोगोचा वापर file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : हॉटेल चालकांकडून बॅनरवर एसटीच्या लोगोचा वापर

थांबा नाही तरीही बस थांबते : वरिष्ठ अधिकारी साखर झोपेत

पुढारी वृत्तसेवा

Hotel Operators Use ST Logo on Banners

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या वतीने प्रवाशांना चहा पाणी पिण्यासाठी काही मोजक्या हॉटेवर थांबा दिलेला असतो. त्या अधिकृत थांब्यावरच एसटी थांबवणे नसतानाही हॉटेलवर बस थांबते. एवढेच नाही तर हॉटेलच्या नावाच्या बॅनरवर चक्क एसटीचा लोगो वापरत आहे. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असूनही एसटीचे वरिष्ठ अधिकारी मात्र साखर झोपेत आहेत. या प्रकरणाशी काही अधिकास्यांचे लागेबांधे आहेत की अशी चर्चा सुरू आहे.

हा प्रकार जालना जिल्ह्यातील रामनगर परिसरातील हॉटेल पृथ्वीराज येथे घडत आहे. या हॉटेलला पूर्वी जालना आगारांतून अधिकृत थांबा दिला होता. दरम्यान हा थांबा रद्द करण्यात आला आहे. तशी सूचना सर्व बसचालकांना दिल्या आहेत. असे असतानाही अनेक बस प्रवाशांसह त्या ठिकाणी बिनदिक्कतपणे थांबत आहेत.

विशेष म्हणजे या हॉटेलचे असलेल्या बॅनरवर चक्क एसटीचा लोगो वापरण्यात आला आहे. याकडे अद्यापही अधिकास्यांचे लक्ष गेले नाही की जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे. अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

बियरबार अॅण्ड रेस्टॉरंटचा बोर्ड

विशेष म्हणजे या हॉटेलच्या बॅनरवर फॅमिलीसाठी स्पेशला असा उल्लेख आहे. त्याचबरोबर प्रवेशद्वारावरच बियरबार अॅण्ड रेस्टॉरंट असे लिहिले आहे. एसटीच्या प्रवाशांना ही सुविधाही उपलब्ध करण्यात आली की काय अशीही चर्चा सर्वसामांन्य प्रवासी करत आहेत.

तत्काळ कारवाई करू त्या हॉटेलला एसटीचा अधिकृत थांबा नाही. त्या ठिकाणी बाहेर जिल्ह्यातील बस थांबत असतील, जालना जिल्ह्यातील बस थांबत नाहीत. तरीही त्याबाबत चौकशी करण्यात येईल. दरम्यान हॉटेल चालकाने त्यांच्या बॅनरवर एसटीचा लोगो वापरणे चुकीचे असून त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल.
मनीषा सपकाळ, विभाग नियंत्रक जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT