Harsul Lake : हर्सूल तलावाचा साठा अवघ्या सहा फुटांवर file photo
छत्रपती संभाजीनगर

Harsul Lake : हर्सूल तलावाचा साठा अवघ्या सहा फुटांवर

गढूळ पाणी पुरवठ्याच्या नागरिकांच्या तक्रारी : १६ वॉर्डावर जलसंकटाचे सावट

पुढारी वृत्तसेवा

Harsul Lake water level down to just six feet

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या पाणीपुरवठ्याचे संकट आता जुन्या शहराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. अपुऱ्या पावसामुळे हर्मूल तलावातील पाणीसाठा अवघ्या सहा फुटांवर आला असून, तलावावर अवलंबून असलेल्या जुन्या शहरासह हडको परिसरातील १६ वॉर्डाच्या पाणीपुरवठ्याची चिंता वाढली आहे. एकीकडे तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे, तर दुसरीकडे उरलेल्या पाण्याच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्याने महापालिकेनेही पाणीउपसा कमी करून तीन ते चार एमएलडीवर आणला आहे.

हसूल तलावाची मूळ साठवण क्षमता २९ फूट आहे. यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्याने तलावाची पातळी १६ ते १८ फुटांपर्यंतच पोहोचली. पावसाळा संपताच त्यात मोठी घट झाली. सध्या तलावातून १० एमएलडी पाणी उचलण्याऐवजी केवळ तीन ते चार एमएलडी उपसा केला जात आहे. या पाण्यावर प्रक्रिया करून जुन्या शहरासह हडकोला पाच ते आठ दिवसांच्या अंतराने पुरवठा केला जातो.

साठा आणखी घटल्यास या भागातील पाणीपुरवठा सांभाळणे कठीण होणार आहे. दरम्यान, हर्मूल तलावातील पाण्याला मातीचा रंग येत असून, पाणी साठविल्यानंतर तीन-चार दिवसांत त्यात जंतू तयार होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. त्यामुळे गढूळ पाण्याऐवजी दिल्लीगेट जलकुंभातून जायकवाडीचे पाणी देण्याची मागणी होत आहे.

यासाठी शहागंज जलकुंभातून नवीन दिल्लीगेट जलकुंभात पाणी आणण्याचे नियोजन आहे. मात्र, नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीने जलकुंभाचे काम पूर्ण केले असले, तरी अद्याप तो महापालिकेच्या ताब्यात दिलेला नाही. हस्तांतरण रखडल्य पर्यायी व्यवस्थेचा वापरही लांबणी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनपाने कमी केला पाणी उपसा हर्सूल तलावाची पातळी झपाट्याने कमी होत आहे. या तलावातून सुरू असलेला अनधिकृत पाणी उपसा आम्ही बंद केला आहे. तसेच मनपाने देखील पाणी उपसा देखील कमी केला आहे.
दत्तात्रय गायकवाड कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठ विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT