Harsul Lake : हर्सूल तलाव पुन्हा कोरडा पडण्याच्या मार्गावर file photo
छत्रपती संभाजीनगर

Harsul Lake : हर्सूल तलाव पुन्हा कोरडा पडण्याच्या मार्गावर

२०१४ नंतर प्रथमच उद्भवली गंभीर स्थिती : १३ वॉर्डाच्या पाण्यासाठी जायकवाडीचा पर्याय

पुढारी वृत्तसेवा

Harsul Lake on the verge of drying up again

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील १३ वॉर्डाच्या पाणीपुरवठ्याचा आधार असलेला हर्सूल तलाव पुन्हा कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. या तलावाची पाणीपातळीत झपाट्याने घट होत असून अवघ्या १० फुटांवर आली आहे. गेल्या बारा वर्षांत या तलावाच्या पाणीसाठ्याने एवढा तळ गाठला नव्हता. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थितीमुळे पुन्हा तलाव कोरडा पडण्याची भीती निर्माण झाली आहे. २०१४ नंतर प्रथमच गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या १३ वार्डासाठी जायकवाडीच्या पाण्याचा पर्याय पुढे आला आहे.

शहरातील १३ वॉर्डाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख आधार असलेल्या हसूल तलावाची पाणीपातळी यंदा झपाट्याने खालावली आहे. २८ फूट क्षमतेचा तलाव ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच अवघ्या १० फुटांवर आला आहे. गेल्यावर्षी याच काळात तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला होता. २०१४ पासून हसूल तलाव कोरडा पडलेला नव्हता. मात्र यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पुन्हा तलाव तळ गाठण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, या तलावातून शहरातील गणेश कॉलनी, टाइम्स कॉलनी, घाटी परिसराचा काही भाग, शताब्दी नगर, हिना नगर, एस.टी. कॉलनी, हरिष कॉलनी, मुजीब कॉलनी यांसह विविध भागांना पाणीपुरवठा केला जातो. या तलावाचे पाणी दिल्ली गेट आणि हिमायत बाग येथील टाक्यांमध्ये घेऊन त्यातून संबंधित भागांना वितरित केले जाते.

तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत हिमायत बाग येथे बांधण्यात आलेली टाकीही हर्सूल तलावाच्या जलवाहिनीला जोडण्यात आली आहे या टाकीचे काम पूर्ण झाल्यानंतर कनेक्शन देऊन ती वापरात आणण्यात आली असून, गेल्या दोन वर्षांपासून या टाकीतून पाणीपुरवठा केला जात आहे.

दरम्यान, हर्मूल तलावाजवळील जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात १३ वॉर्डाना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी महिनाभरापूर्वी नवीन पाणी योजनेचे काम सुरू असताना फुटली. त्यामुळे दोन दिवस हर्सल तलावाचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. दुरुस्ती केल्यानंतर पुरवठा पूर्ववत झाला. मात्र काही दिवसांतच पुन्हा जलवाहिनीला गळती लागल्याने चार दिवस दुरुस्तीसाठी पुरवठा बंद ठेवावा लागला. या प्रकारामुळे संबंधित १३ वॉर्डाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला

जायकवाडीच्या पाण्यासाठी नवी टाकी तयार

मनपा आयुक्तांच्या बंगल्याजवळ नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाकी उभारण्यात आली आहे. मात्र, या टाकीला पाइपलाइन जोडण्याचे काम अद्याप बाकी आहे. कंत्राटदार कंपनीच्या माहितीनुसार हे काम पुढील १५ दिवस ते महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही जोडणी पूर्ण झाल्यानंतर हर्सल तलावावर अवलंबून असलेल्या १३ वॉर्डाना या टाकीतून जायकवाडीचे पाणी देता येणार आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा आणखी खालावल्यास पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी नगरसेवक आणि मनपा अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT