Harshawardhan Jadhav drought demand  Pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar drought | तहसीलदारांनी शासनाच्या कायद्याचे अनुपालन करावे, वे‍ळोवेळी दुष्काळ स्थिती कळवावी :हर्षवर्धन जाधव

Harshawardhan Jadhav drought demand - दुष्काळ जाहीर करण्यासाठी हर्षवर्धन जाधवांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा तहसीलवर मोर्चा -

पुढारी वृत्तसेवा

कन्नड - तहसीलदारांनी शासनाच्या कायद्याचे अनुपालन करून शासन परिपत्रकनुसार वेळोवेळी दुष्काळाची स्थिती सरकारला कळवावी. कन्नड-सोयगाव तालुक्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊनही शेतकऱ्यांना मदत मिळत नाहीत. शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन या तालुक्यांना तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावे, असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे.

कन्नड सोयगाव तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावे, या मागणीसाठी त्यांनी तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्च्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र मगर, माजी जि. प. सदस्य अवचित वळवळे, सामाजिक विचारवंत गणेश घुगे, राजू तुपे, युसूफ पठाण, राजेंद्र हार्दे यांच्यासह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कन्नड तालुक्यातील धनगरवाडी (औराळा) येथील आयुष्य संपवलेल्या शेतकऱ्याला श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. शेतकरी सधन झाला तरच व्यापार उदीम वाढेल .व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांना सहकार्य केले पाहिजे.

शासनाच्या परिपत्रकात २३ मे २०१५ आणि ३ नोव्हेंबर २०१५ मधील शासन आदेशातील दुष्काळी काळात करावयाच्या तरतूदी वाचून दाखविल्या. त्यात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे शासकीय मदत देण्यात आलीच पाहिजे. शेतकऱ्याने पेरणी केलेल्या संपूर्ण शेतीत नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पावसाभावी करपून गेलेली पिके शेतकऱ्यांनी शेतातून काढून घेतली आहे. शेतकऱ्याच्या शेतात आता पिके नसली तरी त्यांना भरपाई दिली.

पूर्वीसारखी पिक पैसे आनेवारी समिती आता राहिली नाही, त्यात बदल करण्यात आले. तालुक्यातील मोठ्या हतनूर गावात पर्जन्यमापक यंत्रच उपलब्ध नाही. तेव्हा तिथे किती पाऊस पडला? हे कसे कळणार? ३० सप्टेंबर ही पिक पैसेवारी जाहीर करण्याची अंतिम तारीख आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी तहदीलदार, जिल्हाधिकारी यांनी तातडीने निर्णय घेऊन कन्नड - सोयगाव मतदारसंघ दुष्काळग्रस्त घोषित करावा.

नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यापैकी एकही ठिकाणी विकासकामे होताना दिसत नाही. मी आमदार असतो तर हा मोर्चा काढायची गरजच पडली नसती. शेतकऱ्यांना लगेच मदत केली असती. चमकोगिरी करून फोटोशेसन करून दुष्काळ घोषित होत नाही, त्यासाठी शासनाच्या परिपत्रकाचा अभ्यास करावा लागतो. तरच लोकांची कामे होतात. अधिकाऱ्यांनी शासन नियमानुसार कामे करावी, असा उपरोधिक टोला लावतांना यापुढे नाकर्ते आमदार निवडून न देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी सरपंच प्रभाकर सुसलादे, रामेश्वर वेताळ, मुन्ना पैलवान, अविनाश डगळे आदींनी परीश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT