कन्नड : दि. २३ रोजी तालुक्यातील टापरगाव शिवारात शिवना नदीच्या पुलावर प्रतिबंध असलेल्या विविध कंपनीच्या गुटखा ईनव्हा गाडीत घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी गाडी सह १३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गुलाब मिसळे, गोपाळ पाटील, नांदवे, अशोक वाघ, अनिल चव्हाण, सनी खरात या सह ग्रामीण पोलिसांनी हि कारवाई केली असून आरोपी जितेश अशोक कुरलिये रा. हनुमाननगर गारखेडा परिसर जि. छ.संभाजीनगर (इनोव्हा गाडीचालक) बिलार रा. कपडा बाजार मार्केट धुळे जि.धुळे यांची गाडी संशय आल्याने अडवून तपासणी केली असता १ लाख ८० हजाराचा गोवा नावाचा गुटखा, १ लाख ३५ हजार सहाशे रुपयांचा राजनिवास पानमसाला गुटखा, २ लाख ६ हजार आठशे रुपयाचा विमल पानमसाला, ५२ हजार आठशे रूपयाचा बीग टोबॅको गुटखा, व बीग टोबॅको, छोट्या आकाराचा १३ हजार दोनशे रुपयांचा गुटखा, आदी इनोव्हा गाडीसह एकूण १३ लाख ७६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीना अटक केली आहे.
यातील आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे जिन्सी, पोलीस ठाणे वेदांतनगर अकोल जि.अहमदनगर, सोलापुर मडुप अंतर्गत गुन्हे दाखल आहे. सदर गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार करत आहे.