File Photo
छत्रपती संभाजीनगर

पैठण शहरातील किराणा व्यापाऱ्याला डोळ्यात मिरची पावडर टाकून लूटले

आरोपीला अटक

पुढारी वृत्तसेवा

पैठण : पैठण शहरातील प्रसिद्ध किराणा मालाच्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून अज्ञात चोरट्यांनी पैशाची बॅग लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि.१३) रात्री घडली होती. बॅग लुटणाऱ्या सराईत आरोपीला ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, पैठण शहरातील प्रसिद्ध पंकज किराणा मालाचे व्यापारी राजेंद्रकुमार श्रीकिशन सारडा (रा. भवानीनगर पैठण) येथील रहिवासी व्यापारी आपले दुकान बंद करून पैशाची बॅग स्कुटी वाहनावरून नेत असताना रात्री साडेआठ वाजता अचानक मोटर सायकल वरून आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून पैशाची बॅग लुटून नेल्याची घटना घडली होती. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख सपोनि सिद्धेश्वर गोरे ,पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल या पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून विविध भागात नाकेबंदी करून आरोपीचा शोध सुरू केला होता.

सदर घटनेचा तपास चालू असताना ग्रामीण गुन्हा शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती आधारे बॅग लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराची माहिती मिळविली असता यामध्ये आरोपी सुभाष उर्फ इटीशन उर्फ पप्प्या वरज्या भोसले (रा. थेरगाव ता. पैठण) यांनी आपल्या साथीदाराच्या मदतीने बॅग लुटून नेल्याची माहिती प्राप्त होताच पोलीसांनी त्याला पकडले आहे. ही कारवाई अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सपोनि पवन इंगळे, सफ़ौ थोटे, पोह नामदेव शिरसाठ, कासीम शेख, श्रीमंत भालेराव, वाल्मीक निकम, शिवानंद बनगे, नरेंद्र खंदारे,अशोक वाघ, विजय धुमाळ, तरमाळे, घोलप, निलेश कुडे, संजय तांदळे, शिवाजी मगर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT