Viral Video file photo
छत्रपती संभाजीनगर

Viral Video: महाराष्ट्र हादरला! तरुणीला मध्यरात्री ओढत नेले, १५ मिनिटे दोघांमध्ये झटापट, शेवटी...; व्हिडिओ समोर येताच खळबळ

crime news: मध्यरात्री एका तरुणीला रस्त्यावरून ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मोहन कारंडे

Viral Video

छत्रपती संभाजीनगर: शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नागेश्वरवाडी परिसरात मध्यरात्री एका तरुणीला रस्त्यावरून ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यामुळे महिलांच्या सुरक्षेचा आणि पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजून २७ मिनिटांच्या सुमारास घडली. क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागेश्वरवाडी परिसरात एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण एका तरुणीला जबरदस्तीने रस्त्यावरून ओढत नेताना दिसत आहे. ही तरुणी स्वतःची सुटका करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचेही फुटेजमध्ये दिसत आहे.

नागरिकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

ज्या वेळी हा प्रकार सुरू होता, त्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट होता. साधारण १० ते १५ मिनिटे हा तरुण तरुणीला त्रास देत होता. मात्र, परिसरातील एका जागरूक नागरिकाने आपल्या घराच्या खिडकीतून आवाज दिल्यानंतर संबंधित तरुण आणि तरुणीने तिथून पळ काढला. विशेष म्हणजे, घटनेच्या पाच दिवसांनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणी अद्याप कोणीही अधिकृत तक्रार दिलेली नाही. मात्र, घटनेची गंभीरता लक्षात घेऊन क्रांती चौक पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित तरुण आणि तरुणीचा शोध घेत आहेत. यामागे नेमके काय कारण होते, याचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT