घाटी रुग्णालयातील नवीन सर्जिकल बिल्डिंगसाठी जुने तीन वॉर्ड पाडणार file photo
छत्रपती संभाजीनगर

घाटी रुग्णालयातील नवीन सर्जिकल बिल्डिंगसाठी जुने तीन वॉर्ड पाडणार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : घाटीत मेडिसीन बिल्डिंगच्या बाजूला सुमारे दोन एकर जागेत १२ मजली टोलेजंग नवीन सर्जिकल बिल्डिंग उभी राहणार आहे. यासाठी जुने वॉर्ड क्रमांक ५, ६ आणि कैद्यावर उपचारासाठी असलेले वॉर्ड क्रमांक १० हे तीन वॉर्ड पाडावे लागणार आहेत. यासह ऑक्सिजन प्लांटही इतरत्र हटवावे लागणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.

जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधारवड असलेल्या घाटीतील मुख्य सर्जिकल इमारतीसह अनेक सोयीसुविधा पन्नास वषपिक्षा जास्त जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णसेवा करताना डॉक्टरांसह प्रशासनासमोरही अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे नवीन सुसज्ज अशा सर्जिकल बिल्डिंगसाठी घाटी प्रशासनातर्फे शासनाकडे सुमारे ७६८ कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे. नुकतेच मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटीला भेट देत डॉक्टरांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी घाटीच्या मागण्यांच्या पूर्ततेची आश्वासन दिले होते. त्यानुसार सुमारे दोन एकर जागेत १२ मजली टोलेजंग सर्जिकल इमारतीचा प्रस्ताव तयार करणे सुरू आहे. दरम्यान, नवीन सर्जिकल बिल्डिंगसाठी जुने आणि बंद असलेले वॉर्ड क्रमांक ५ व ६ आणि वॉर्ड क्रमांक दहा पाडले जातील. तसेच येथील ऑक्सिजन प्लांटही इतरत्र हलवला जाईल. याच जागेवर टोलेजंग नवीन सर्जिकल बिल्डिंग उभारण्याचे नियोजन सुरू आहे.

नविन सर्जीकल बिल्डिंग झाल्यावर आत्ताची इमारत पाडून त्या ठिकाणी वैद्यकीय विद्यार्थ्यांचे एक आणि विद्यार्थीनींचे एक असे दोन वेगवेगळे स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT