Sambhajinagar News : दाम दुप्पटच्या आमिषाने लुटणाऱ्या गेट वे हेल्प कंपनीचा पर्दाफाश file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : दाम दुप्पटच्या आमिषाने लुटणाऱ्या गेट वे हेल्प कंपनीचा पर्दाफाश

मुख्य व्यवस्थापकासह महिला एजंट गजाआड

पुढारी वृत्तसेवा

'Gateway Help' company, which swindled people with the lure of doubling their money, exposed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : २० दिवसांत गुंतवलेल्या रकमेवर दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या गेट वे हेल्प कंपनीच्या रॅकेटचा आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. कंपनीचा मुख्य व्यवस्थापक संदीप शिवदास जाधव (४६, रा. वसई, पालघर) याच्यासह महिला एजंट आशा सखाराम देवकर (४०, रा. बीड) आणि प्रतिभा आशिषकुमार पांडे शुक्ल (४०, रा. वडोदरा, गुजरात) यांना अटक केली आहे. यांच्याविरूद्ध अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.

नरसिंग दौलतसिंग महेर (५२, रा. कच्चीघाटी, वरुड) यांच्याकडून चाळीसगाव येथील परिचित चतुरसिंग शिंदे याने ३० हजार रुपये हातउसने घेतले होते. पैसे मागितल्यानंतर शिंदे यांनी गेट वे हेल्प कंपनीत गुंतवणूक केल्यास २० दिवसांत दाम दुप्पट मिळत असल्याचे सांगितले. तसेच २८ ऑक्टोबर रोजी शिंदे यांनी महेर यांना जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये या कंपनीचे व्यवस्थापक जाधव आणि एजंट देवकर व पांडे यांची ओळख करून दिली. गोव्यातील कॅसिनोत कंपनी पैसे गुंतवते असे सांगण्यात आले.

पैसे परत देऊन विश्वास संपादन

महेर यांनी १० हजार रुपये जाधव याच्याकडे गुंतवले. याच्या परताव्याच्या बदल्यात सहा हजार रुपये महेर यांच्या खात्यावर जमा केले. यामुळे महेर यांना गुंतवणुकीबाबत विश्वास वाढला. दरम्यान सहा हजार रुपयांनंतर पैसे जमा होणे बंद झाल्याने महेर यांनी शिंदे यांच्याकडे पैसे परत मागितले. त्यावेळी त्यांना हातपाय तोडण्याची धमकी मिळाली.

गुन्हा दाखल; आरोपी गजाआड

१२ नोव्हेंबर रोजी आरोपी जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळताच महेर यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक भंडारे यांच्या पथकाने तिघांना अटक केली. या रॅकेटमध्ये आणखी किती गुंतवणूकदारांची फसवणूक झाली, याचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT