गंगापूर तालुक्यात पाणीटंचाईचा वणवा pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Gangapur Water Crisis : गंगापूर तालुक्यात पाणीटंचाईचा वणवा

वाढत्या उन्हामुळे जलस्रोत आटले, 23 गावांना 33 टँकरने पाणीपुरवठा

पुढारी वृत्तसेवा

रमाकांत बन्सोड

गंगापूर : मे महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाने तीव रूप धारण केल्याने गंगापूर तालुक्यासह जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालले आहे. ग््राामीण भागातील विहिरी, कूपनलिका आणि पारंपरिक जलस्रोतांनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी प्रशासनाला तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा आधार घ्यावा लागत असून, सध्या तालुक्यातील 23 गावे व वाड्यांना तब्बल 33 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी जनजीवन अक्षरशः होरपळून निघत असून, ग््राामीण भागात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती वाढली आहे. अनेक ठिकाणी महिलांना पहाटेपासूनच हंडाभर पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. काही गावांमध्ये दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत टँकरग््रास्त गावांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. यामुळे महसूल, ग््राामविकास आणि पाणीपुरवठा विभाग सतर्क झाले असून, संभाव्य टंचाईग््रास्त भागांची पाहणी सुरू करण्यात आली आहे

नळपाणी योजनांनाही फटका

ग््राामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना यंदाच्या उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. जलस्रोत आटल्याने अनेक गावांतील नळांना पाणी येणे बंद झाले असून, नागरिकांची संपूर्ण भिस्त आता टँकरवरच राहिली आहे. काही गावांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

19 खासगी विहिरींचे अधिग््राहण

पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने 19खासगी विहिरींचे अधिग््राहण केले आहे. यापैकी 15 विहिरींमधून टँकर भरले जात असून, उर्वरित 4 विहिरींमधील पाणी पाइपलाइन किंवा अन्य पर्यायी व्यवस्थेद्वारे प्रतापूरवाडी, देवळी, मांडवा व धामोरी खुर्द या 4 गावासाठी नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहे.

टँकरच्या खेपा

टँकरच्या 2 खेपा नियमित राहाव्यात, यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून, गावनिहाय मागणीचा आढावा घेऊन पुरवठा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग््राामीण भागात टंचाईची स्थिती गंभीर होत आहे. नागरिकांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी टँकरच्या खेपांचे नियोजन करण्यात आले आहे. विहिरींच्या अधिग््राहणातून पाणीटंचाई कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

40 हजार नागरिक टँकरवर अवलंबून

टंचाईची झळ इतकी तीव झाली आहे की, सुमारे 40 हजार लोकसंख्या सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून झाली आहे. प्रशासनाकडून दररोज 33 टँकरद्वारे 66 खेपा केल्या जात असून, मागणी वाढत असल्याने आणखी टँकर सुरू करण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे.

पाणीपातळी घटली

गतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा उन्हाळ्यात टंचाईची तीवता कमी राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मार्चअखेरपासूनच पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आणि एप्रिलच्या मध्यापासून परिस्थिती गंभीर बनली. अनेक गावांतील बोअरवेल कोरड्या पडल्या असून, काही ठिकाणी मोटारी बंद पडल्याने नळपाणी योजना ठप्प झाल्या आहेत.

पावसाचे सर्वांना वेध

वाढत्या टंचाईमुळे ग््राामीण भागात चिंता व्यक्त होत असून, आता सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत. आगामी काही आठवड्यांत पावसाने हजेरी लावली नाही, तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरू असल्या तरी, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

टंचाईचे वास्तव :

एका नजरेत

  • बाधित गावे व वाड्या : 23

  • सुरू असलेले टँकर : 33

  • दैनंदिन खेपा : सरासरी 66

  • टँकरवर अवलंबून लोकसंख्या : सुमारे 67 हजार 954

  • अधिग््राहित खासगी विहिरी : 19

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT