Gangapur News : पतीचे अनैतिक संबंध असल्याची भीती दाखवत ५ लाखांचा गंडा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Gangapur News : पतीचे अनैतिक संबंध असल्याची भीती दाखवत ५ लाखांचा गंडा

भोंदूबाबा आणि साथीदारांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Gangapur News: 5 lakh rupees fraud by fearing that husband has immoral relationship

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : घरातील संकटे दूर होतील, पतीचे कथित अनैतिक संबंध संपुष्टात येतील आणि कौटुंबिक कलह मिटेल, असे आमिष दाखवत एका भोंदूबाबाने २६ वर्षीय विवाहितेला तब्बल पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

फिर्यादी सोनाली बाळासाहेब तागड (२६, रा. शिराळ चिचुंडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) या सध्या भेंडाळा फाटा (ता. गंगापूर) येथे वास्तव्यास आहेत. मार्च २०२६ मध्ये त्यांच्या पतीच्या मोबाईलवरील एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांची ओळख कमलाकर जोशी (५०, रा. गंगापूर) याच्याशी झाली होती.

सोनाली यांनी आपल्या कौटुंबिक अडचणींबाबत माहिती दिल्यानंतर आर ोपीने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर घरात मोठे संकट असून पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे खोटे सांगून भीतीचे वातावरण निर्माण केले. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून विशेष होम-हवन विधी करावा लागेल, असे सांगत आरोपीने वेळोवेळी पैशांची मागणी केली.

१० मार्च ते १ जून २०२६ या कालावधीत आरोपीच्या सांगण्यावरून सोनाली यांनी २३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत सुमारे २ लाख ३५ हजार रुपये आहे, तसेच ७ हजार रुपये रोख आरोपीच्या साथीदारांकडे दिले. याशिवाय फोनपे आणि बँक खात्यामार्फत २ लाख ५८ हजार रुपये आरोपीच्या खात्यात वर्ग केले. अशा प्रकारे एकूण सुमारे ५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोनाली यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार कमलाकर जोशी, त्याचा मुलगा व अन्य दोन अन- ोळखी इसमांविरुद्ध शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनी विठ्ठल झांजुर्णे तपास करत आहेत.

होमहवनाच्या नावाखाली उकळले लाखो रुपये

भोंदू बाब आणि त्याच्या साथीदारांनी सदर महिलेचा विश्वास संपदान करून तुमच्या वरील संकट दुर करण्याठी होमहवन करावे लागेल अशी बतावणी करत महिलेकडून सोने, चांदी, रोख रक्कम असा ५ लाखांचा गंडा महिलाला लावला. अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि खोट्या धार्मिक विधींच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याने अशा व्यक्तींपासून सावध राहावे, आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT