गवळीशिवरा धरणातून विद्युत पंपांच्या सहाय्याने सुरू असलेला अवैध पाणी उपसा.  (छाया, रमाकांत बन्सोड)
छत्रपती संभाजीनगर

illegal water extraction dam : गवळीशिवरा प्रकल्पातून बेसुमार पाणीउपसा

सात गावांतील पाणी योजनेवर परिणाम होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

गंगापूर : तालुक्यातील गवळीशिवरा येथील लघु प्रकल्प धरणातून विद्युत मोटारींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध पाणी उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सात गावांसाठी कार्यान्वित असलेल्या पिण्याच्या पाणी योजनेवर याचा गंभीर परिणाम होत असून, धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था ग््राामस्थांवर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

गवळीशिवरा धरणातून फुलशिवरा, प्रतापूरवाडी, गवळी धानोरा, वसूसायगाव, गाजरमळा आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, काही प्रभावशाली शेतकऱ्यांकडून वीज चोरी करून दिवस-रात्र बेकायदेशीररीत्या पाणी उपसा केला जात असल्याचे उघड झाले आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने घसरत असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत आहे.

अवैध पाणी उपशासाठी धरणाच्या संरक्षण भिंतीलगत पाईपलाईन टाकण्यासाठी थेट खोदकाम करण्यात आले आहे. या प्रकारामुळे धरणाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणेकडून वेळेत उपाययोजना न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.ग््राामस्थांकडून या प्रकाराबाबत तीव संताप व्यक्त केला जात आहे.

गवळीशिवरा धरणातून सुरू असलेल्या अवैध पाणी उपशाबाबत संबंधित पाटबंधारे विभागाला तातडीने कारवाईच्या सूचना देणार आहे.
नवनाथ वगवाड, तहसीलदार, गंगापूर
काही शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून अधिकृत परवानगी घेतली आहे. मात्र, जे कोणी अवैध पाणी उपसा करत असतील त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करण्यात येईल; अन्यथा कठोर कारवाई केली जाईल
सुदर्शन तवार,, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, गंगापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT