Gang of interstate robbers arrested with weapons
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : लासूर स्टेशन परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या आंतरराज्य गुन्हेगार टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचून जेरबंद केले. तेलंगणा व महाराष्ट्रात गुन्हे दाखल असलेल्या या पोलिसांनी टाकलेले हे मोठे मसावजफ ठरले असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवारी (दि.४) माहिती मिळाली की, शिल्लेगाव पोलिस ठाणे हद्दीतील लासूर स्टेशनजवळील एका हॉटेलजवळ ४ ते ५ इसम हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेले आहेत. ही माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी सपोनि पवन इंगळे यांच्या पथकाला तातडीचे निर्देश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मध्यरात्री मिळालेल्या माहितीचे ठिकाण लासूर स्टेशन ते ए. एस. क्लब जाणारे रोडवर सांवगी शिवारातील हॉटेल अभिनंदन समोर कारवाईसाठी पोहोचले. सदर ठिकाणी हजर अस लेले इसमांना पोलिसांची चाहुल लागताच पळून जाऊ लागले. त्यापैकी चंदू जमाल शेख (३७, रा. टैरवोट हिलालनगर देगलूर नाका, नांदेड), मोहम्मद तय्यब मिया (३५, रा. जैलाबुद्दीन गल्ली, म्हैसा, ता. निर्मल, जि. आदिलाबाद राज्य तेलंगणा), विधिसंघर्ष बालक यांचा पाठलाग करून शिताफीने पकडले.
तसेच त्यातील दोन इसम पळून गेले. दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत हत्यारासह आरोपीमिळून आले. त्यांच्या ताब्यात एक विनाक्रमांकाची फोर्ट कंपनीची कार, हत्यार बनावट पिस्टल, गलोर, लोखंडी टॉमी, बनावट नंबर प्लेट, मिरची पावडर, नायलॉन रस्सी, दोन धारदार चाकू, पळून गेलेले इसमांच्या व पकडलेल्या इसमांचे मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर आरोपी हे रेकॉर्डवरील असून, त्यांच्यावर तेलंगणा राज्यात व महाराष्ट्रात नांदेड व इतर ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर इसमांविरुध्द पोलिस स्टेशन शिल् लेगाव येथे अनिल काळे, पोलिस अंमलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे शिल्लेगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई एलसिबिचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत, सपोनि. पवन इगंळे, पोह वाल्मीक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, अनिल काळे, महेश बिरुटे, संजय तांदळे, योगेश तरमळे यांनी केली आहे.
दोघे पळून गेले
दरोडेखोरांच्या ताब्यात एक विनाक्रमांकाची फोर्ट कंपनीची कार, हत्यार बनावट पिस्टल, गलोर, लोखंडी टॉमी, बनावट नंबर प्लेट, मिरची पावडर, नायलॉन रस्सी, दोन धारदार चाकू, पळून गेलेले इसमांच्या व पकडलेल्या इसमांचे मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.