छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील डीजे चालक आणि लाईट ऑपरेटर्सची बैठक पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घेतली. बैठकीस प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही उपस्थित होते.
ध्वनिप्रदूषण कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणार असून, मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होईल, असा इशारा आयुक्त पवार यांनी दिला. ठरवून दिलेल्या डेसिबल मयदितच ध्वनिप्रक्षेपण करावे, अन्यथा डीजे जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ध्वनिप्रदूषणाची तक्रार डायल 112 किंवा 9226514001 या क्रमांकावर करता येणार असून, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, मंगळवारी सातारा तांडा भागात अहिल्यानगर येथून आणलेल्या डीजेचा प्रचंड दणदणाट सुरू होता. ही माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी आरटीओ अधिकाऱ्यांसह कारवाई करत डीजे जप्त केला. चालकाला ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.