Fuel Price Hike: Air Travel with IndiGo Becomes Costlier
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विमान इंधनाच्या (एटीएफ - एव्हिएशन टर्बाइन फ्युएल) दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे इंडिगो एअरलाइन्सने आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील इंधन शुल्कात (फ्युएल चार्जेस) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुधारित दरवाढ मंगळवारच्या (दि.७) मध्यरात्रीपासून सर्व नवीन तिकीट बुकिंगवर लागू केली आहे.
गेल्या महिनाभरातच एटीएफच्या दरांमध्ये १४ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली असून, इंधनाचे दर गेल्या दशकातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. विमान कंपन्यांच्या एकूण परिचालन खर्चामध्ये इंधनाचा वाटा सर्वाधिक असतो, त्यामुळे खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी हे पाऊल उचलणे भाग पडल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्रवाशांवरील आर्थिक भार मर्यादित राहावा म्हणून टप्प्याटप्प्याने अंतरानुसार ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
इंडिगोच्या अंतरनिहाय नवीन स्लॅबनुसार छत्रपती संभाजीनगर येथून विविध शहरांसाठी द्यावे लागणारे नवे इंधन शुल्क खालीलप्रमाणे असेल.