Chhatrapati Sambhajinagar Fraud Case pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Fraud Case : रोज २६०० रुपये भाड्याचे आमिष; 'इनोव्हा' घेऊन चाळीसगावचा भामटा पसार

मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Fraud Case: Lured by the promise of ₹2,600 daily rent; conman from Chalisgaon absconds with an 'Innova'

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा प्रतिदिन २६०० रुपये भाडे देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची लाखो रुपयांची 'इनोव्हा क्रिस्टा' कार घेऊन पोबारा केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. सुरुवातीचे दोन महिने नियमित भाडे दिल्यानंतर आरोपीने भाड्याचे पैसे देणे बंद केले आणि गाडीही परत करण्यास नकार दिला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर सुरेश पाटील (३४, रा. चाळीसगाव) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी श्रेयश बालाजी जाधव (२६, रा. रामनगर, एन-२, सिडको) याचा मित्र सागर यादव याच्या माध्यमातून त्याची ओळख शिवाजीनगर येथे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या सुमित पतंगे याच्याशी झाली होती. सुमितच्या ओळखीने सागरने त्याची कार ज्ञानेश्वर पाटील याला प्रतिदिन २६०० रुपये भाड्याने दिली होती.

ज्ञानेश्वरला आणखी एका गाडीची आवश्यकता असल्याने, सागर आणि सुमित यांनी श्रेयशला त्याची 'इनोव्हा क्रिस्टा' कार (एमएच- २२-एडब्ल्यू-१५२६) भाड्याने देण्यास सुचवले.

श्रेयशच्या रामनगर येथील घरी या व्यवहारावर चर्चा झाली आणि २६०० रुपये प्रतिदिन भाडे देण्याचे ठरले. त्यानुसार ३ मार्च रोजी बाबा पेट्रोल पंप येथे ज्ञानेश्वर पाटील आणि त्याचा ड्रायव्हर नीलेश कोळी यांच्याकडे श्रेयशने आपली गाडी सुपूर्द केली.

दोन महिने दिले भाडे, नंतर काढला पळ

गाडी भाड्याने दिल्यानंतर सुरुवातीचे दोन महिने ज्ञानेश्वरने सुमित पतंगे याच्याकडे नियमितपणे भाड्याचे पैसे पाठवले. मात्र दोन महिन्यांनंतर त्याने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. श्रेयशने वारंवार ज्ञानेश्वरचे मोबाईल क्रमांक आणि त्याचा ड्रायव्हर नीलेश कोळी याच्याशी संपर्क साधून भाड्याचे पैसे आणि गाडी परत मागितली. मात्र उडवाउडवीची उत्तरे देत त्यांनी आजतागायत गाडी परत केलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक बोचरे या करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT