Sambhajinagar Crime News : बजाजनगर दरोडाप्रकरणी आणखी चार आरोपींना अटक  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : बजाजनगर दरोडाप्रकरणी आणखी चार आरोपींना अटक

नांदेडमधील सोने व्यापारी, अन्य एकासह अंबाजोगाईतील दोघांना ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

Four more accused arrested in Bajajnagar robbery case

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

बजाजनगर येथील दरोडाप्रकरणी गुन्हेशाखेच्या पथकाने बुधवारी (दि.४) रात्री आणखी चार आर-ोपींना अटक केली. यात चोरीचे सोने विकत घेणाऱ्या नांदेड येथील सोने व्यापाऱ्यासह अन्य एकाला आणि आरोपी सुरेश गंगणेच्या दोन साथीदारांना अबांजोगाई येथून अटक करून त्यांच्या ताब्यातून २० तोळे सोने जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आशिष जयकुमार बाकलीवाल (४२, रा. वजीराबाद, नांदेड), शेख शहारुख शेख रफिक (३२, रा. देगलूर नाका, नांदेड), शेख अबुजर ऊर्फ शाहिद (२३, रा. अंबाजोगाई, बीड), शेख सोहेल शेख मुस्तफा (२६, रा. अंबाजोगाई, बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या बहुचर्चित दरोडा प्रकरणाच्या तपासाला गती मिळत असून, आरोपींच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी चार जणांना अटक केली. यामध्ये दरोड्याच्या मालाची खरेदी करणारा नांदेडमधील सोनार आशिष जयकुमार बाकलीवाल याला अटक केली आहे.

तर पूर्वी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोर सुरेश गंगणे याच्या नजीकचे शेख शाहरुख शेख रफिक, शेख अबुजर ऊर्फ शाहिद, शेख सोहेल शेख मुस्तफा यांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान उद्योजक संतोष लड्डा यांच्या बजाजनगरमधील घरात १५ मे रोजी मध्यरात्री दरोडा पडला होता. यावेळी साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी आणि ७० हजार रुपये रोख असा कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता.

पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फूटेज आणि खबऱ्यांच्या माहितीतून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत एकूण १६ आरोपींना अटक केली आहे. मात्र त्या तुलनेत वसूल झालेला ऐवज अत्यंत तुटपुंजा असून, आजपर्यंत केवळ ५० ते ६० लाखांचा ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे, जे मूळ चोरीच्या प्रमाणात फारच नगण्य आहे. त्यामुळे उर्वरित सोने-चांदी कुठे लपवण्यात आले आहे, याचा तपास अद्यापही पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

अन् गंगणेने उघडले तोंड

मृत अमोल खोतकर याच्यानंतरचा मुख्य आरोपी सुरेश गंगणे याला कोंडीत पकडल्यावर त्याने तोंड उघडले. यावेळी त्याने कबुली दिली की, उर्वरित सोने विक्रीसाठी त्याने अंबाज- ोगाईतील साथीदार शेख सोहेल याच्याकडे दिले होते. पुढे सोहेलने ते शेख शाहरुख आणि शेख अबुजर यांच्या मदतीने ते सोने नांदेडमधील सोनार आशिप बाकलीवाल याला विकल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळत सुमारे २० लाख रुपये किमतीचे १९.४ तोळे सोने हस्तगत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT