lok kala mahotsav : गुलाबी थंडीत उगवली शुक्राची चांदणी File Photo
छत्रपती संभाजीनगर

lok kala mahotsav : गुलाबी थंडीत उगवली शुक्राची चांदणी

मान्यवरांच्या उपस्थितीत लोककला महोत्सवाचा आज समारोप

पुढारी वृत्तसेवा

Folk art festival concludes today in the presence of dignitaries

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : लोककला महोत्सवाच्या सुरुवातीपासून तरुणाईने विद्यापीठ परिसर फुलून गेला होता. त्यात भर दुपारी सुरू झालेल्या लावणी स्पर्धेला खऱ्या अर्थाने सायंकाळी रंग चढला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या लोकंकलेत उगवली शुक्राची चांदणी ही लावणी घेऊन नर्तकिा फिरकतच मंचावर आली आणि चार तासांपासून खुचीला खिळून बसलेल्या रसिकांचा शिनच निघून गेला.

या महोत्सवात ११ कलाप्रकार सादर करण्यात आले. प्रत्येक संघाने आपापल्या कला प्रकारात जीव ओतून सादरीकरण केले. सर्वात कमी संघानी गोंधळ प्रकारात सहभाग नोंदवला होता. या कला प्रकारात सात संघांनी चांगलाच गोंधळ घातला. या गोंधळातही एकनाथी भारुड विंचू चावला काम क्रोध विंचू,आज मोबाईल चावला.. आता नोटीफिकेशन.... आता शंचा डिजिटल विंचू चावला ने उपस्थितांना खिळवून ठेवले.

महोत्सवाचा आज समारोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने लोककला महोत्सवाचा समारोप सोमवारी (दि.१२) सायंकाळी रंगकमी गणेश चंदनशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. विजेत्या संघाचा प्रत्येक कला प्रकारात तीन पारितोषिक तसेच सांघिक ढाल वितरण यावेळी करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT