Flight Service : संभाजीनगर-पुणे विमानसेवेसाठी 'फ्लाय ९१' उत्सुक, पण स्लॉटची अडचण Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Air Service : संभाजीनगर-पुणे विमानसेवेसाठी 'फ्लाय ९१' उत्सुक, पण स्लॉटची अडचण

छत्रपती संभाजीनगर हुन मुंबई आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरू करण्यास फ्लाय ९१ एअरलाइन्स उत्सुक असून, स्लॉट मिळाल्यास तातडीने सेवा सुरू करता येईल

पुढारी वृत्तसेवा

'Fly 91' keen on Sambhajinagar-Pune flight service, but slot problem

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगरहुन मुंबई आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरू करण्यास फ्लाय ९१ एअरलाइन्स उत्सुक असून, स्लॉट मिळाल्यास तातडीने सेवा सुरू करता येईल, मात्र सध्या या दोन्ही विमानतळांवर स्लॉट मिळविणे कठीण ठरत असल्याचे फ्लाय ९१ एअरलाइन्सचे एमडी आणि सीईओ मनोज चाको यांनी सांगितले.

मण्टीडीएफच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी बुधवारी ई-मेलद्वारे इंडिगो, एअर इंडिया, अकासा, एअर इंडिया एक्सप्रेस, फ्लाय ९१ आणि स्टार एअर या विमान कंपन्यांकडे छत्रपती संभाजीनगर-पुणे-छत्रपती संभाजीनगर या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. या ई-मेलला मफ्लाय ९१फ्वे मनोज चाको यांनी त्वरित प्रतिसाद देत, शहरातून मुंबई आणि पुण्यासाठी उक्षण सुरू करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले, मात्र त्यासाठी विमानतळांवरील स्लॉट उपलब्धतेचा अडथळा असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या संभाजीनगरला महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या महानगराशी म्हणजेच पुण्याशी हवाईमार्गे जोडण्यासाठी प्रवासी आणि व्यावसायिक वर्गाकडून सातत्याने मागणी होत आहे.

सध्या रस्त्यावरील खड्डे, रेल्वे मार्गातील मर्यादा आणि प्रदीर्घ प्रवासामुळे नागरिकांना पुणे गाठण्यासाठी सात-आठ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे संभाजीनगर-पुणे विमानसेवा कधी सुरू होणार? हा प्रश्न प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT