पहिले मराठी वैद्यकीय साहित्य-संस्कृती संमेलन छत्रपती संभाजीनगरात file photo
छत्रपती संभाजीनगर

पहिले मराठी वैद्यकीय साहित्य-संस्कृती संमेलन छत्रपती संभाजीनगरात

आयएमएतर्फे आयोजन : डॉक्टरांमधील सुप्त गुणांना मिळणार वाव

पुढारी वृत्तसेवा

First Marathi Medical Literature-Culture Conference held in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

डॉक्टरांमध्ये लपलेल्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सर्जनशील अभिव्यक्तीसाठी राष्ट्रीय व्यासपीठ उभे राहावे यासाठी आयएमएच्या वतीने पहिले भारतीय वैद्यकीय साहित्य-संस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ व १५ फेब्रुवारी असे दोन दिवस शहरातील एमआयटी कॉलेज येथे हे संमलेन होणार असल्याची माहिती आयएमएचे अध्यक्ष तथा संमलेनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर यांनी मंगळवारी (दि.३) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संमेलन कार्याध्यक्ष डॉ. शहाजी

तौर, डॉ. यशवंत गाडे, डॉ. अमोल देशमुख व डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांची उपस्थिती होती. डॉ. शहाजी तौर म्हणाले, संमलेनाचे उद्घाटन कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांच्या उपस्थित होणार असून, या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्र आणि मराठी साहित्य-संस्कृती यांचा समृद्ध संगम अनुभवता येणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत विद्यार्थी, पालकांमध्ये आरोग्य जागृतीसाठी सप्तरंग आरोग्याचे, चित्रकला स्पर्धा माझा डब्बा माझा मित्र, निबंध स्पर्धा फास्ट फूड, शाप की वरदान, वक्तृत्व स्पर्धा यांसह ग्रंथदिंडीचे आयोजन केले आहे. शब्द पल्लवी, ललित लेख संमेलन, गझल ए इश्क मराठी गझल आणि कवी संमेलन तसेच सायंकाळी माकडाच्या हाती शॅम्पेन या नाटिकेचे सादरीकरण होईल. दुसऱ्या दिवशी लेखक मंगेश होडोळे, लेखक अरविंद जगताप यांची मुलाखत होईल.

वैद्यकीय क्षेत्रातील नवरत्नांसोबत परिसंवाद होणार आहे. संमेलनस्थळी ग्रंथदालन, कलादालन, वस्त्रालंकार दालन, खाऊगल्ली यासारख्या विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उपस्थित राहण्याचे आवाहन

वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, साहित्यिक, विद्यार्थी आणि मराठीप्रेमी नागरिकांनी या अभिनव संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले असून, मोफत नोंदणीसाठी लिंक दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT