Side Effects Of Firecrackers Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Firecrackers Noise: अरेरे! फटाक्याच्या आवाजाने बहिरेपणाचे रुग्ण ३० टक्क्यांनी वाढले

ॲलर्जी, श्वसन विकारासह डोकेदुखी, सर्दी, खोकल्याचाही त्रास

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे बहिरेपणाचे रुग्ण तब्बल दहा टक्क्यांनी वाढले आहे. या दिवसांत धुरामुळे शहरात वायू प्रदूषण होऊन अनेकांना ॲलर्जी, सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि कानदुखीचा त्रासही वाढला आहे. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात धाव घ्यावी लागली. अशा रुग्णांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढली होती. आताही अनेकांवर औषधोपचार सुरू असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

दरवर्षी दिवाळीत फटाके फोडूनच आंनदोत्सव साजरा केला जातो. दीपोत्सवाच्या या चार दिवसांत धूर सोडणाऱ्या फटाक्यांमुळे हवेतील प्रदूषण वाढते. यंदाही दिवाळीत कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन वायू प्रदूषण वाढल्याने सर्वाधिक त्रास दम्याच्या रुग्णांना झाला. त्यांचा श्वास कोंडला गेल्याने उपचारासाठी रुग्णालयात धाव घ्यावी लागली.

श्रसनविकार, दमा, अलर्जी, खोकल्याचा आजार बळावून ही संख्या २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढली. तर तुफान मोठ्या आवाजाच्या फटक्यामुळे आधीच कमी ऐकू येणाऱ्यांसह या दिवसात श्रवणशक्ती कमी झालेल्यांची संख्या ५ ते १० टक्क्यांनी वाढली. यापैकी निम्मे रुग्ण औषधोपचाराने बरे झाले. मात्र, निम्म्या रुग्णांना आणखी काही दिवस उपचार घ्यावे लागणार, असे रुग्ण येत राहतील, असेही डॉक्टरांनी सांगितले. दिवाळीत पर्यावरणपूरक फटाके फोडावे, मास्क वापरावा, फटाक्यांच्या धुरापासून लांब राहावे, मुलांनाही दूर ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

फटाक्यांमुळे इअर लॉसच्या रुग्णांत वाढ - फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे श्रवणशक्ती कमी झालेल्या रुग्णांची संख्या ५ ते १० टक्क्यांनी वाढली आहे. आधीपासून श्रवणशक्ती कमी असलेल्यांचा त्रास वाढला. कानात सुई आवाज येणे, कानदुखीसह इअर लॉसचे रुग्ण अनेकांवर अद्यापही औषधोपचार सुरू आहेत.
डॉ. विजय विटोरे, ईएनटी सर्जन, धूत हॉस्पिटल.
ॲलर्जी, सर्दी, खोकला, डोकेदुखीचा त्रास - दिवाळीत फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढून ॲलर्जी, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीच्या रुग्णांची संख्या २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. सर्वच ईएनटी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी होती. २० टक्के रुग्ण औषधोपचाराने बरे झाले आहेत.
डॉ. शरद शेळके,कान, नाक-घसा तज्ज्ञ, मेडीकव्हर हॉस्पिटल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT