Sambhajinagar News : पॉलीकॅब वायर्सच्या गोदामाला आग file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : पॉलीकॅब वायर्सच्या गोदामाला आग

साऊथ सिटीच्या समोर आणि म्हाडा कॉलनीच्या बाजूला असलेल्या रविवारी (दि.३) दुपारी ३.३० च्या सुमारास पॉलीकॅब वायर्सच्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

Fire breaks out at Polycab Wires warehouse

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

साऊथ सिटीच्या समोर आणि म्हाडा कॉलनीच्या बाजूला असलेल्या रविवारी (दि.३) दुपारी ३.३० च्या सुमारास पॉलीकॅब वायर्सच्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीची माहिती नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच, पदमपुरा आणि कांचनवाडी येथील अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. वायर्सचे गोदाम असल्याने आग वेगाने पसरण्याची व मोठे नुकसान होण्याची भीती होती. मात्र, जवानांनी पाण्याचा मारा करत आग वेळीच आटोक्यात आणली. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT