Fire at a milk dairy in Bajaj Nagar; losses worth lakhs
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : बजाजनगर येथील दूध डेअरी अँड डेली निड्स दुकानाला मंगळवारी (दि. १३) मध्यरात्रीनतंर आग लागून लाखोचे नुकसान झाले. शार्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज दुकान मालकाने वर्तविला आहे.
मनोज जैन यांची बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकाजवळ शक्ती दूध डेअरी अँड डेली निड्स नावाने दुकान आहे. बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास जैन यांच्या दुकानातून धुराचे लोळ येत असल्याचे पाहून रस्त्याने जाणाऱ्या इसमाने जैन यांना फोन करून दुकानाला आग लागल्याची माहिती दिली होती.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तासाभराच्या परिश्रमानतंर आगीवर नियत्रंण मिळविले. मात्र तो पर्यंत दुकानातील ५ फ्रीज, ड्रायफुड, कॅरेट, रॅक तसेच दिवाळीला विक्री करण्यासाठी घेतलेले सामान आगीत जळून खाक झाले. या आगीत लगतच्या साई गणेश हॉस्पिटल तसेच पॅथॉलॉजीचे देखील किरकोळ नुकसान झाले.