Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : आर्थिक डबघाईतील मनपा दुभाजकावर खर्च करणार ६ कोटी

महापौरांचे घुमजाव; ऐनवेळचे विषय घेणार नाही म्हणत १३ कोटींचे प्रस्ताव मंजूर

पुढारी वृत्तसेवा

Financially struggling Municipal Corporation to spend ₹6 crore on road dividers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असतानाही पदाधिकारी-प्रशासनाकडून उधळपट्टी सुरूच आहे. महापौर, सभापती यांचा प्रभाग असल्याने सुस्थितीत दुभाजक काढून त्याऐवजी तब्बल ६ कोटी खर्चाचे दगडी दुभाजक उभारण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. त्यास महापौर समीर राजुरकर यांनीही मंजुरी दिली. विशेष म्हणजे महापौरपदी विराजमान झाल्यानंतर सर्वसाधारण सभेत यापुढे ऐनवेळचे विषय घेणार नाही, असे राजुरकर म्हणाले होते. पंरतु त्यांनीच या प्रस्तावासोबतच १३ कोटींचे ऐनवेळचे ठराव मंजूर केल्याचे चर्चेला उधाण आले आहे.

दीड महापालिका मागील दशकांपासून प्रचंड आर्थिक संकटात आहे. यामुळे केंद्र आणि राज्याच्या विविध विकासात्मक योजनांमध्येही महापालिकेला स्वहिश्श्याचे पैसे टाकणे शक्य होत नाही. त्यासाठी शासनाकडे हात पसरावे लागत आहे. एवढेच काय तर महापालिकेच्या मालमत्ता तारण ठेवून कर्ज घ्यावे लागत आहे. अगोदरच महापालिकेकडे कंत्राटदारांची २५० कोटींची देणी शिल्लक आहेत.

तर मागील दहा वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या देणीपोटी ७० कोटी थकले आहेत. आता तर चक्क सुस्थितीतील दुभाजक काढून त्याठिकाणी दगडी दुभाजक टाकण्याचा घाट प्रशसानाने घातला आहे. दुभाजकांमध्ये पाम ट्री उभारून आकर्षक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

त्यासाठी पर्यटनाच्या राजधानीचे शहर आणि त्यातील मुख्य बाजारपेठेकडे जाणारा रस्ता असे निमित्त पुढे करून प्रशासनाने मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळी ५ कोटी ९७ लाख ९९ हजार ७१९ रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीस्तवर सादर केला. त्यात मिलकॉर्नर ते संभाजीपेठ, महात्मा फुले चौक ते सतीश मोटार्स, सावरकर चौक ते वरद गणेश चौक या २६३० मीटर लांबीच्या रस्त्यावर दगडी दुभाजक उभारण्यात येणार.

२०० मीटरचीच दुरवस्था या चारही रस्त्यांवरील दुभाजकापैकी तापडिया नाट्यगृह ते एसबी बस थांबा, जि. प. कार्यालयसमोरील परिसर असे २०० मीटर लांबीच्याच दुभाजकाची दुरवस्था झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT