दोनशे एमएलडी पाणी शहरात पोहोचण्याआधीच नगरसेवकांत चढाओढ pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

दोनशे एमएलडी पाणी शहरात पोहोचण्याआधीच नगरसेवकांत चढाओढ

समन्यायी पाणीपुरवठ्याचे महापौर यांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

Fight among corporators even before 200 MLD water reaches the city

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरासाठी राबवण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे पहिल्या टप्प्यातील २०० एमएलडी पाणी शहरात दाखल होण्यापूर्वीच नगरसेवकांत चढाओढ लागल्याचे दिसून आले. यासंदर्भात काही प्रभागांतील नगरसेवकांनी काही भागात पाच दिवसांआड तर अनेक भागांत आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळत असल्याची लेखी तक्रार महापौर समीर राजुरकर आणि महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडे केली आहे. यावर शहरातील प्रत्येक भागाला समन्यायी पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे महापौर राजुरकर यांनी गुरुवारी (दि.५) पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

शहराला मुबलक पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या अमृत पेयजल योजनेअंतर्गत २५०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. याद्वारे पहिल्या टप्प्यात शहराला २०० एमएलडी पाणी मिळणार आहे. मात्र हे पाणी शहराला मिळण्याअगोदरच माझ्या प्रभागाला मुबलक पाणी मिळावे, यावरून नगरसेवकांमध्ये चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे.

यासंदर्भात काही नगरसेवकांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच काही भागांना नियमित चार ते पाच दिवसांआड पाणी मिळत आहे. मात्र काही उच्चभू वसाहतीसह अनेक भागांना आठ ते दहा दिवसांआड पाणी येत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. तर पाणी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोपही होत आहेत.

त्यावरून पाणीपुरवठा यंत्रणेवरील ताण आणि उन्हाळ्यातील वाढती मागणीने पाणी व्यवस्थापनाचे आव्हान अधिकच गंभीर बनले आहे. काही नगरसेवकांनी महापालिकेच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करत पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पारदर्शक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, महापौर समीर राजुरकर यांनी या संदर्भात शहरातील प्रत्येक भागाला समन्यायी पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले.

यावेळी महापौर राजुरकर यांनी सांगितले की, उन्हाळा सुरू होत असल्याने पाण्याची मागणी वाढणार आहे. तर जुन्या पाईपलाईनमुळे काही ठिकाणी गळती किंवा पाईप फुटण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे भविष्यात पाण्याची टंचाई कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र तोपर्यंत उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून सर्व भागांना शक्य तितका समतोल पुरवठा करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT