FDA : दिवाळीच्या तोंडावर एफडीएची कारवाई; ४ मिठाई उत्पादकांचे परवाने निलंबित file photo
छत्रपती संभाजीनगर

FDA : दिवाळीच्या तोंडावर एफडीएची कारवाई; ४ मिठाई उत्पादकांचे परवाने निलंबित

सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी आणि अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील चार प्रमुख अन्न आस्थापनांचे परवाने व नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आली आहेत.

पुढारी वृत्तसेवा

FDA takes action ahead of Diwali; licenses of 4 sweet manufacturers suspended

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी आणि अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील चार प्रमुख अन्न आस्थापनांचे परवाने व नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आली आहेत. तपासणीदरम्यान या आस्थापनांमध्ये अस्वच्छता, गंजलेली उपकरणे, अन्न व पाण्याच्या चाचण्यांचा अभाव, तसेच प्रक्रिया तापमान नियंत्रणात गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.

आयोध्यानगर, वडगाव कोल्हाटी येथील मे. बालाजी बिकानेर मिठाईवाला (प्रोप्रायटर जगदीशगिरी नथुगिरी गोस्वामी) या आस्थापनात अपुरे वायुवीजन, गंजलेली उपकरणे, अन्नपदार्थांच्या चाचण्यांचा अभाव तसेच सफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांच्या स्वतंत्र साठ-वणुकीची व्यवस्था नसल्याचे आढळले.

मे. मधुर मिलन एंटरप्रायझेस (प्रोप्रायटर : डूंगरसिंग हिरालाल राजपुरोहित), एमआयडीसी रेल्वे स्टेशन येथे अनधिकृत पॅकिंग साहित्याचा वापर, पाण्याचा अभाव आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. तर मे. राजस्थानी बिकानेर प्रॉडक्ट (प्रोप्रा-यटर : शुभम पवनकुमार अग्रवाल), रेल्वे स्टेशन रोड, एम-आयडीसी येथे गंजलेली उपकरणे, निसरडी फरशी, मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी आणि अस्वच्छता आढळून आली.

मे. जगदंबा स्वीट्स (प्रोप्रायटर नरेशसिंग जीवरा-जसिंग राजपुरोहित), बजाजनगर, वडगाव कोल्हाटी येथे कीड नियंत्रण, स्वच्छतेचे वेळापत्रक, मोजमाप साधनांचे कॅलिब्रेशन आणि पुरवठा साखळीविषयक निकषांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. या चारही आस्थापनांचे परवाने व नोंदणी निलंबित करून त्यांना व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निलंबनाच्या, कालावधीत अन्नपदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग, विक्री आणि वितरण पूर्णपणे थांबवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

संबंधित क्षेत्रातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना निलंबनाच्या कालावधीत या पेढ्यांवर कडक पाळत ठेवण्याचे आणि त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सार्वजनिक आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यावसायिकाची गय केली जाणार नाही. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करावे. अन्यथा, यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई सुरू राहील.
- श्रीकांत करकळे सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, संभाजीनगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT