Sambhajinagar Crime News : तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला

दोन आरोपी अटकेत; चिकलठाणा भागातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Fatal attack on young man with sword

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पुराणे झगडे के बारे में बैठकर बातचीत करेंगे, असे सांगत तरुणाला बोलावून घेत कारमधून तलवारी उपसून दोघांनी हल्ला केला. डोक्यात घाव घालून दोन्ही हातावर, पायावर सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि.११) रात्री २ वाजेच्या सुमारास उडलिफ हॉटेल, जालना रोडवर घडली.

अरबाज खान मझर खान (१९, रा. किराडपुरा) आणि शारुख सत्तार सय्यद (२५, रा. नारेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांना अटक केली असून, न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली.

जखमी फिर्यादी जुनेद जुबेर शेख (२६, रा. हिनानगर, चिकलठाणा) याच्या तक्रारीनुसार, तो रात्री घरी असताना आरोपींनी त्याला कॉल केला. पुराणे झगडे के बारे में बैठकर बातचीत करेंगे, असे सांगत त्याला उडलिफ हॉटेल, जालना रोडवर बोलावून घेतले. जुनेद येताच दोघांनी त्याच्याशी वाद घातला.

गाडीतून तलवारी काढून थेट जुनेदवर हल्ला केला. अरबाजने त्याच्या डोक्यात तलवारीने घाव घातला. शारुखने तलवारीने दोन्ही हातावर आणि पायावर सपासप वार केले. या हल्ल्यात जुनेद रक्तबंबाळ होऊन जमिनीवर को-सळला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक संजय काळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT