शेतकऱ्यांनी त्वरित केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी : आ. जाधव file photo
छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांनी त्वरित केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी : आ. जाधव

तालुक्यातील : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान प्रक्रियेस गती देण्यासाठी केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन आमदार संजना जाधव यांनी केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Farmers should complete the KYC process immediately: MLA Jadhav

कन्नड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान प्रक्रियेस गती देण्यासाठी केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन आमदार संजना जाधव यांनी केले आहे.

ऑक्टोबर २०२४ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ५५०७ शेतकऱ्यांची तसेच सप्टेंबर २०२५ वर्षातील ९४७३ शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. एकूण १४,९८० शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण असल्यामुळे शासनाच्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आमदार संजना जाधव यांनी सांगितले की, संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. केवायसी पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मंजूर होणारे अतिवृष्टी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास मदत होईल.

त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने विलंब न करता आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात किंवा ऑनलाईन पद्धतीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी सतत प्रयत्नशील असून, कोणताही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT