देवगाव रंगारी : कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे महावितरणच्या मनमानी, ढिसाळ आणि असंवेदनशील कारभाराचा कडेलोट झाला असून, शेतकरी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे शेती, पशुपालन, छोटे उद्योग आणि घरगुती जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पाण्याअभावी शिवारात उभी असलेली मका, गहू, हरभरा, भाजीपाला व इतर नगदी पिके सुकू लागली असून, लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांच्या पदरी पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
देवगाव रंगारीसह धोंदलगाव फिडर व परिसरातील अनेक गावांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेकडो शेतकऱ्यांचे वीज पंप बंद पडले आहेत. शेतीला पाणी देता न आल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, आम्ही पिकांसाठी कर्ज काढले, बियाणे, खत, औषध, मजुरीवर मोठा खर्च केला, पण वीज नसल्याने सगळेच वाया जाण्याची वेळ आली आहे,फफ अशी व्यथा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत ग््राामपंचायत व शेतकरी प्रतिनिधींनी सहायक अभियंता श्रीमती जोशी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी निवेदने दिली होती. दिवसा नियमित वीजपुरवठा सुरू करावा, फिडरवरील बिघाड तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र महावितरण प्रशासनाकडून केवळ आश्वासने देण्यात आली आणि प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने बुधवारी शेतकऱ्यांचा संयम अखेर संपला.
विशेष बाब म्हणजे तीन महिन्यांपूर्वी देवगाव रंगारीसाठी 10 हजार के.व्ही. क्षमतेचा, तब्बल 30 टन वजनाचा नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र संबंधित ठेकेदार व विभागाच्या उदासीनतेमुळे हा ट्रान्सफॉर्मर आजही बसवलेला नाही. तो कार्यान्वित झाला असता परिसरातील वीजप्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला असता, पण प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी आणि ग््राामस्थांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी संतप्त शेतकरी मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयावर धडकले. ङ्गङ्घवीज नाही तर शेती नाही आणि ङ्गङ्घशेतकरी जगला तर देश जगेलफफ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेतकऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून कार्यालय बंद केले आणि जोपर्यंत दिवसा सुरळीत वीज मिळत नाही, तोपर्यंत कोणालाही आत सोडणार नाही, असा ठाम इशारा दिला. भर उन्हात अभियंता व कर्मचाऱ्यांना तब्बल तीन तास बाहेरच ताटकळत ठेवण्यात आले.
अखेर कन्नड येथील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसवणे, फिडरवरील तांत्रिक बिघाड दूर करणे आणि दिवसा नियमित वीजपुरवठा सुरू करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, यापुढे आश्वासनांवर विश्वास नाही; वीज आली नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरू,फफ असा इशारा शेतकरी व ग्रामपंचायतीने दिला आहे.
दरम्यान, वीजपुरवठा ठप्प राहिल्याने शेतीबरोबरच दूध व्यवसाय, किराणा दुकाने, वेल्डिंग वर्कशॉप, पीठ गिरण्या, कोल्ड ड्रिंक व बेकरीसारखे लघुउद्योगही मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे संपूर्ण गावाची ग््राामीण अर्थव्यवस्था धोक्यात आली असून, सामान्य नागरिकांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे.देवगाव रंगारीतील हा उद्रेक म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदनेचा, निराशेचा आणि व्यवस्थेवरील रोषाचा स्फोट आहे. शेती वाचवण्यासाठी लढणारा शेतकरी आता आपल्या हक्काच्या विजेसाठीही निर्धाराने उभा राहिला असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर हा लढा आणखी तीव होणार, हे निश्चित आहे.
विजेअभावी व्यवसाय ठप्प
वीज नसली की आमचा धंदाच बंद पडतो. फिज, डीप फीझर, मशीन, लाईट सगळं थांबतं आणि रोजचं नुकसान वाढत जातं. दूध, थंड पेये, बेकरीचा माल सडतो, ग््रााहक नाराज होतात. महावितरणला आमचं नुकसान दिसत नाही, पण आम्हाला रोज ते झेलावं लागतं. वेळेवर वीज दिली नाही तर छोटा व्यापारी टिकणारच नाही. आम्ही बिल वेळेवर भरतो-मग सेवा कुठे आहे?
आमच्या पिकांना पाणी नाही, पण महावितरणला वेळ नाही. तीन-तीन महिने ट्रान्सफॉर्मर पडून आहे, हे कोणासाठी? आम्ही बियाणे, खत, औषध, मजुरीवर लाखो रुपये घातले, पण वीज नसल्याने सगळे हातातून जात आहे. रात्री अपुरी वीज, दिवसा काहीच नाही-अशा परिस्थितीत शेती कशी करायची? आम्ही भीक मागत नाही, आमचा हक्क मागतोय. वीज दिली नाही तर हा लढा इथेच थांबणार नाही.साहेबराव गोरे , शेतकरी.