आन्वा ः शिवारात हार्वेस्टरच्या मदतीने गहू काढण्यात येत आहे.  (छाया ः सादिक शेख)
छत्रपती संभाजीनगर

Mechanised farming : हार्वेस्टरच्या मदतीने गहू काढण्याकडे शेतकऱ्याचा कल

भोकरदन तालुक्यात गहू काढणीला आला वेग, मजूर मिळेना

पुढारी वृत्तसेवा

आन्वा ः सध्या सर्वत्र गहू काढणीला आला आहे. तर काही अंशी गव्हाची काढणी देखील अनेक भागात पूर्णत्वाकडे आली आहे. सोंगणी करिता होणारा मजुरी खर्च, कष्ट, यांचा विचार करता आधुनिक यंत्र हार्वेस्टरच्या मदतीने गहू काढण्याकडे अनेक शेतकऱ्याचा कल दिसून येत आहे.

मागील वर्षीच्या सुरुवातीपासूनच कमी पाऊस असल्याने खरीप हंगामातील पिकांना फटका बसला होता, मात्र अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गव्हाची पेरणी मोठ्यप्रमाणावर झाली. यावर्षी 72 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून 17 हजार हेक्टर गव्हाची पेरणी झाली आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 100 टक्के रब्बी हंगामातील लागवड करण्यात आली आहे. तर मागील पाच वर्षींच्या तुलनेत यंदा गव्हाची पेरणी ही 100 टक्के झाली आहे. पाच वर्षांच्या तुलनेत गव्हाची पेरणी समाधानकारक वाढ झाली आहे.

उत्पन्न कमी

घरोघरी मातीच्या चुली नव्हे तर घरोघरी गव्हाची चपाती या चपातीच्या आवडीमुळे सध्या गव्हाला मागणी चांगली आहे. मात्र दिवसेंदिवस होणाऱ्या वातावरणीय बदलांमुळे अलिकडे गव्हाचे उत्पादन कमी झाले आहे. परंतु त्या तुलनेत गहू बियाणे पासून ते लागवड, निंदणी, खते, कीटकनाशकांची फवारणी, सोंगणी, आदी बाबतीत खर्च प्रचंड वाढले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT