प्रतिनिधी लासुरस्टेशन : गंगापूर तालुक्यातील भागाठाण येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संजय कचरू आमराव (वय ५०) यांचे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.9) सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेने भागाठाणसह पंचक्रोशीतील गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास त्यांना विजेचा धक्का लागल्याने नातेवाईकांनी तात्काळ लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.चाटे यांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान बुधवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत शेतकऱ्याचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर भागाठाण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी दोन मुले व एक मुलगी आहे.