पशुसंवर्धन विभागाच्या बैठकीला उपस्थित मान्यवर. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

fake milk crackdown Sambhajinagar : बनावट दुधाविरोधात जिल्हा परिषद प्रशासन आक्रमक

पशुसंवर्धन विभागाच्या बैठकीत विविध प्रश्नांचा आढावा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात बनावट दुधाच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासन आक्रमक झाले असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा पशुपालन व दुग्धशाळा समितीचे सभापती जितेंद्र जायस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत पशुसंवर्धन विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सुरुवातीला मागील कामकाजाचा आढावा घेत प्रलंबित विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सदस्यांनी आपल्या भागातील समस्या मांडताना पशू लसीकरणातील अडथळे, मृत व आजारी जनावरांना उचलण्यासाठी ॲनिमल लिफ्टिंग क्रेनची कमतरता, ग््राामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना जागेचा अभाव, नव्या दवाखान्यांची गरज तसेच जुन्या दवाखान्यांच्या दुरुस्तीचे प्रश्न अधोरेखित केले.

ग््राामसभांमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या प्रतिनिधींची उपस्थिती अनिवार्य करावी, विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत तसेच शासकीय योजनांमध्ये लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, अशा मागण्या सदस्यांनी मांडल्या. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, बनावट दुधामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारांत सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असून, प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दवाखान्यांची अपुरी सुविधा, मनुष्यबळाची कमतरता

दरम्यान, बैठकीत लिफ्टिंग क्रेनअभावी मृत जनावरांच्या विल्हेवाटीत अडचणी येत असून पर्यावरण व आरोग्याचे धोके वाढत आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यांची अपुरी सुविधा आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ग््राामीण भागातील पशुपालकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची बाबही समोर आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT