Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

अनामत रक्कम भरण्यासही २९ मेपर्यंत संधी : मनपा आयुक्तांचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Extension of online application process for Pradhan Mantri Awas Yojana

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : योजनेअंतर्गत (एएचपी घटक) सुरू असलेल्या घरकुल अर्ज नोंदणी प्रक्रियेला नागरिकांकडून अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासनाने सोमवारी (दि. १८) मुदतवाढ जाहीर केली आहे. आता इच्छुक व पात्र लाभार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी २८ मे पर्यंतची संधी देण्यात आली असून अनामत रक्कम भरण्यासाठी २९ मे पर्यंतची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी मंजूरी दिली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, २७ एप्रिलपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत आतापर्यंत शेकडो नागरिकांनी आपले अर्ज पूर्ण करून सादर केले आहेत. वाढता प्रतिसाद लक्षात घेता अधिकाधिक नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. बँकमार्फत आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख २९ मे असून, संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंतच ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.

ऑनलाईन व्यवहाराची ३० मेपर्यंत मुदत

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. २७ एप्रिल ते १८ मे या कालावधीत अनेक अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केले आहेत.

वाढत्या प्रतिसादामुळे अर्ज नोंदणीची अंतिम तारीख २८ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच अर्जदारांना अनामत रक्कम भरण्यासाठी २९ मेपर्यंत बँक व्यवहाराची तर ३० मेपर्यंत ऑनलाईन व्यवहाराची मुदत देण्यात आली आहे. प्रशासनाने पात्र लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT