माजी नगरसेवकाकडून मनपा कर्मचाऱ्याला मारहाण Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

माजी नगरसेवकाकडून मनपा कर्मचाऱ्याला मारहाण

करण शिंदे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घरकुल प्रस्तावांची यादी दाखल करून घेणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यास माजी नगरसेवक महेंद्र सोनवणे यांनी कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तसेच महिलांना कार्यालयात पाठवून खोट्या केसमध्ये अडकवण्याचा देखील धमकी दिली आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती, फिर्यादी ईश्वर जाधव हे मनपात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. कार्यालयात दैनंदिन काम सुरू असताना आरोपी सोनवणे त्यांच्या सोबत तिघांना घेऊन कार्यालयात आले. त्यांनी लाभार्थ्यांचे बिल लपवून दुसऱ्या पक्षाचे काम पूर्ण करतो असे म्हणत, जाधव यांचा गळा पकडला. त्यानंतर सोनवणे यांनी जाधवला मारहाण केली. त्यानंतर देखील सोनवणे यांनी काय केस करायची कर म्हणत जाधव यांना धमकी दिली. या प्रकारामुळे मनपा कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT