Shendra MIDC : एमआयडीसीत कारवाईचे 'दिवे' कधी लागलेच नाही File Photo
छत्रपती संभाजीनगर

Shendra MIDC : एमआयडीसीत कारवाईचे 'दिवे' कधी लागलेच नाही

अनेक वर्षांपासून अंधार : प्रशासकीय अकार्यक्षमतेमुळे ठेकेदारांची मनमानी उद्योजक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

Except for a few major roads in the industrial area, street lights on most roads have been out of service for many years.

राहुल जांगडे छत्रपती संभाजीनगर: पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीत प्रसासकीय अकार्यक्षमतेमुळे ठेकेदारांची मनमानी सुरू आहे. या औद्योगिक क्षेत्रातील काही प्रमुख मार्ग वगळता बहुतांश रस्त्यांवरील पथदिवे अनेक वर्षापासून बंद पडले आहेत. मात्र ठेकेदार काय करतो, त्याने कधी तपासणी केली ? लाईट का बंद आहेत? हे जबाबदार अधिकारी कधी बघतच नाही. त्यामुळे ठेकेदारही निर्वावले असून, उद्योजकांनी कितीही तक्रारी केल्या तरी एमआयडीसीत कारवाईचे 'दिवे' कधी लागलेब नाही.

सेंडा एमआयडीसीत लहान-मोठे सुविधा उपलब्न औद्योगिक वसाहत फाईव्ह स्टार नव्हे स्लम

एक हजाराहून अधिक उद्योग आहेत. उद्योगांना लख्ख प्रकाश पाडणाऱ्या पथदिव्यांची करून देण्याची जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाची आहे यासाठी २००० लाईट्स, ११०० फिटिंग आणि ८५० हून अधिक पोल आहेत. हे पथदिये चालू ठेवण्यासाठी दरवर्षी २० लाखांचे टेंडर काढले जाते. गतवर्षी असंसो लाईट्स यांना कंत्राट देण्यात आले होते. दुरुस्तीच्या नावाने त्यांनी वर्षभर कागदोपत्री दिवे लावले, वारंवार तक्रारीनंतरही पथदिवे सुरू झाले नाही.

येथील ए सेक्टर, बी सेक्टर, डी ब्लॉक, सी ब्लॉक, फूट पार्कसह अनेक अंतर्गत रस्त्यांवरील बहुतांश पथदिवे बंद पहले आहेत. आता ५ नोव्हेंबरपासून विटा इलेक्ट्रिकल यांना कंत्राट देण्यात आले आहे. मात्र या एजन्सीनेही मागील पंधरा दिवसांत कुठे-कुठे पथदिवे बंद, काय स्थिती आहे, याची साधी पाहणी केलेली नाही. पाकडे अधिकायांचेही दुर्लक्ष होत असल्याने बंद पथदिवे अद्यापही सुरू होऊ शकलेले नाहीत.

▶ दरवेळी येतो, बघतो, करतो... चे उत्तर पथदिवे सुरू करण्यासाठी अनेक उद्योजकांनी केलेली धडपड व्यर्थ ठरली आहे. त्यांना ठेकेदाराकडून नेहमीच येतो, वपतो, आज करतो, उद्यो करतो, लाईट नाही, अशी उत्तरे मिळतात मात्र ठेकेदार, अधिकारी कधी फिरकत नाही. त्यामुळे दिव्यांची दुरुस्ती होत नसल्याचा संताप उद्योजकांनी व्यक्त केला आहे.

उघड्या फिटिंग दिव्यांची दुरवस्था एमआयडीसीत कुठे तुटलेले दिवे, तर कुठे नुसतेच खांब उभे. लोंबकळणारी वाचर आणि उघड्या धोकादायक फिटिंग असे दयनीय चित्र आहे. अनेक भोकादायक फिटिंगमध्ये चक्क पक्ष्यांनी घरटे आणि भुंग्यांनी घर केले आहे. ( है चित्रच दाखवते की अनेक वर्षापासून पथदिव्यांची दुरुस्ती झालेली नाही.

तीन वर्षांपासून पथदिवे बंद येथील ए, बी, सी सेक्टरचे लाईट मागील तीन वर्षांपासून बंद आहेत. सरंवार तक्रार करूनही पथदिव्यांची दुरुस्ती झालेली नाही. दुरुस्ती करणारे कर्मचारी, ठेकेदार की दिसले नाही.
ज्ञानेश्वर पवार, स्थानिक उद्योजक
लाईट सुरू करावे एमआयडीसीमधील अनेक अंतर्गत रस्त्यांवरील पथदिवे अनेक वर्षापासून बंद आहेत. दररोज सायंकाळनंतर अंधाराचे साप्ताज्य पसरते. त्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे लाईट त्वरित सुरू करावेत.
संजय पठाडे, स्थानिक उद्योजक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT