EV Racing Car : भंगारापासून बनवली ईव्ही रेसिंग कार file photo
छत्रपती संभाजीनगर

EV Racing Car : भंगारापासून बनवली ईव्ही रेसिंग कार

एमआयडीसी स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधील विद्यार्थ्यांचे कौशल्य

पुढारी वृत्तसेवा

EV racing car built from scrap

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा एमआयडीच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे कौशल्य विकासाचे धडे गिरवतानाच येथील विद्यार्थ्यांनी चक्क भंगार साहित्यापासून दोन इलेक्ट्रिक रेसिंग कार बनवल्याची किमया केली आहे. या केंद्रातील ईव्हीएमटी, ईव्हीपीडी, इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग ट्रेडच्या ६० विद्यार्थ्यांनी स्वतःपार्ट-टू-पार्ट असेंबल करून अवघ्या पाच दिवसांत या रेसिंग कारची निर्मिती केली.

शनिवारी केंद्र संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, केंद्रप्रमुख कमलेश नुथी यांच्या उपस्थित या कारचे अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितले, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत ४ ऑगस्ट २०२५ पासून कार्यान्वित या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये फूड प्रोसेसिंग, ऑटोमोटिव्ह, कॅपिटल गुड्स, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशनसह ११ कोर्सचे अनुभवी शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

यापैकीच ऑटोमोटिव्ह डोमेनच्या विद्यार्थ्यांनी जुने टायर्स, खराब वाहनांचे नट बोल्ट्स, स्टिअरिंग, रॉड्स, शॉकप्स, ब्रेक्स, मोटर, ईव्ही कंट्रोलर, वायरिंग हे साहित्य अक्षरशः भंगारातून दोन ईव्ही रेसिंग कार तयार केल्या. केंद्र संचालक म्हणून याचा आनंद आणि अभिमान असून, उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन सर्वोउत्कृष्ट तांत्रिक कुशल कामगार तयार करणे, हेच प्रयत्न असल्याचे वाघमारे म्हणाले.

संभाजीनगरातील प्रस्तावित अनेक प्रकल्पांना कुशल मनुष्यबळाची गरज पडणार आहे, या मागणीची पूर्तता हे स्किल सेंटर करत असून, आतापर्यंत २१ बॅचमधून ६०० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यापैकी ३०० जणांना कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. तर, ५० जणांनी स्वयंरोजगार सुरू केला आहे. केंद्राच्या ठिकाणी दर शनिवारी रोजगार मेळावा आयोजित केला जातो.

एका चार्जमध्ये १५ कि.मी. रेंज

ईव्ही रेसिंग कारमध्ये पीएमएसएम मोटर आणि ४८ व्हॉट्सच्या बॅटरीचा वापर केला आहे. एका फूल चार्जिंगनंतर १५ किलोमीटरपर्यंत प्रवास शक्य होतो. ही कार ३० किमी प्रतितास या वेगाने धावू शकते. याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT