जुन्या वाहनांवरील पर्यावरण करात दुपटीने वाढ file photo
छत्रपती संभाजीनगर

जुन्या वाहनांवरील पर्यावरण करात दुपटीने वाढ

वाहनधारकांच्या खिशाला कात्री

पुढारी वृत्तसेवा

Environmental tax on old vehicles doubled

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जुन्या वाहनांमुळे वाढणारे वायूप्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने पर्यावरण कर (ग्रीन टॅक्स) दुप्पट केला आहे. हा नियम बुधवार (दि.१) पासून लागू असून, यामुळे जुन्या वाहनधारकांचा खिशाला कात्री लागणार आहे.

परिवहन विभागाने जुन्या वाहनांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक वाहनांना चालना देण्याचे ठरवले आहे. वयोमान संपलेल्या वाहनांमुळे वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ती वाहने वापरात आणू नये हा मुख्य उद्देश आहे. प्रदू षणाला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवर अधिक कर आकारून नागरिकांना नवीन किंवा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवण्याच्या मार्गासाठी हा प्रयत्न आहे. याआधी दुचाकी वाहनांवर सुमारे २ हजार रुपये पर्यावरण कर आकारला जात होता. आता तो वाढवून ४ हजार रुपये करण्यात आला आहे. तसेच तीनचाकी आणि चारचाकी वाहनांवरील करातही मोठी वाढ करण्यात आली आहे.

व्यावसायिक वाहनांवर अधिक भार

व्यावसायिक वाहनांसाठीही नियम कडक करण्यात आले आहेत. १५ वर्षांनंतर फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असून, त्यानंतर दर पाच वर्षांनी पर्यावरण कर भरावा लागणार आहे. यामुळे ट्रक, बस आणि टॅक्सी चालकांवर अधिक आर्थिक भार पडणार आहे. कर दुप्पट केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त ताण पडणार आहे.

आर्थिक भार वाढणार

सरकारने सवलत किंवा टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, अशी मागणी अनेक व्यावसायिक वाहन वापरकर्त्यांनी केली आहे. ही करवाढ पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असली, तरी तिचा थेट परिणाम सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशावर होणार असल्याचे मतही व्यावसायिकांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT