E-golf cart ambulance in the Ghati Hospital
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घाटीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी बॅटरीवरील गोल्फ कार्ट अॅम्ब्युलन्स दाखल झाली. मंगळवारपासून याचा वापर सुरू झाल्याने स्ट्रेचरची किटकोट मिटली असून, उपचारसेवा अधिक गतिमान बनली आहे. यामुळे हजारो रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनाही दिलासा मिळत आहे.
येथील घाटी रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. यापैकी अनेकांना ओपीडी, अपघात विभागातून मेडिसिन बिल्डिग आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल केले जाते. यासह विविध वाँडाँत दाखल रुग्णांनाही एमआरआय, सिटीस्कॅनसह इतर काही चाचण्यांसाठी स्ट्रेचर किंवा व्हिलचेअरवरून न्यावे लागते. यासाठी बराच वेळ लागत होता. मात्र घाटीला सीएसआर निधीतून ई-गोल्फ कार्ट सहा सीटर दोन वाहने आणि दोन इलेक्ट्रिक रुग्णवाहिका मिळाल्या. मंगळवारपासून ई-अॅम्ब्युलन्सचा रुग्णांसाठी उपयोग सुरू करण्यात आला, याचा फायदा अनेक रुग्णांना मिळत असून, उपचारासाठी वेळेत पोहोचणे सहज शक्य होत आहे. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. भारत सोनवणे, उपाधिाग्रता डॉ गायत्री तडवळकर, ओएसडी डॉ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुचेता जोशी यांचे सहकार्य मिळत आहे.
रुग्णांना वेळेत उपचार मिळतील : 66 घाटीला ई-गोल्फ कार्ट सहा सीटर दोन वाहने आणि दोन इलेक्ट्रिक रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. दोन्हीही शिफ्टमध्ये या ई-रुग्णवाहिका सतत सुरू राहतील. यामुळे घाटीच्या रुग्णसेवेत आमूलाग्र बदल होऊन वेळेत उपचार मिळतील.- डॉ. शिवाजी सुके, घाटी अधिष्ठाता