Vijayadashami Dussehra : दसऱ्याची तयारी : यंदा ६० फुटी रावणाचे होणार दहन file photo
छत्रपती संभाजीनगर

Vijayadashami Dussehra : दसऱ्याची तयारी : यंदा ६० फुटी रावणाचे होणार दहन

यंदा सिडको एन-७ मैदानावर तब्बल ६० फुटी महाकाय रावणाचे दहन केले जाणार असल्याची माहिती आयोजक बंटी चंदेश दीक्षित यांनी दिली.

पुढारी वृत्तसेवा

Dussehra Preparations: 60-foot Effigy of Ravana to be Burnt This Year

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विजयादशमी अर्थात दसरा सण अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरात उत्सवाच्या तयारीला मोठा वेग आला आहे. असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसऱ्याच्या निमित्ताने शहरातील विविध भागांत रावणदहनाचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा सिडको एन-७ मैदानावर तब्बल ६० फुटी महाकाय रावणाचे दहन केले जाणार असल्याची माहिती आयोजक बंटी चंदेश दीक्षित यांनी दिली.

रावणासोबतच ५० फुटी मेघनाथाच्या पुतळ्याचेही दहन होणार आहे. एन-७ व्यतिरिक्त वाळूज येथे ५५ फुटी, तर मयूरनगरात ४५ फुटी रावणाचे दहन केले जाईल. त्यामुळे यंदा शहरातील विविध भागांत उभारले जाणारे हे गगनचुंबी पुतळे नागरिकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरणार आहेत. वाळूज परिसरातही पुतळे उभारणीची कामे वेगाने सुरू आहेत.

हे पुतळे साकारायासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. पुतळ्यांची उंची जास्त असल्याने त्यांची सुरक्षितता, समतोल आणि मजबूती यावर विशेष भर दिला जात आहे. बांबू, लाकडी सांगाडा, कागद, कापड आणि रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य वापरून रावण व मेघनाथाचे चेहरे, धड, हात आणि मुकुट अत्यंत आकर्षक पद्धतीने घडवले जात आहेत. दसऱ्यापूर्वी काम वेळेत पूर्ण करण्यासाठी १० कारागीर दिवस-रात्र अहोरात्र मेहनत घेत असल्याचे मुख्य कारागीर चांद भाई यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT