In Paithan Husband Killed His Wife
दारुच्या नशेच पतीने केला पत्नीचा खून  File Photo
छत्रपती संभाजीनगर

आपेगावात मद्यपी पतीने केला पत्नीचा खून

करण शिंदे

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील आपेगाव येथे खुनाची घटना उघडकीस आली आहे. मद्यपी पतीने रागाच्या भरात पत्नीचा खून केला आहे. ही घटना सोमवारी (दि.7) घडली. मनीषा ज्ञानेश्वर प्रव्हाणे (वय. 30 रा. आपेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की, आपेगाव येथील ज्ञानेश्वर प्रव्हाणे हे काही दिवसापासून घरी दारू पिऊन आल्यावर सतत पत्नीसोबत मारहाण करत होते. याबरोबरच जिवे मारून टाकण्याची धमकी देत होते. रविवारी (दि.7) मध्यरात्री प्राणघातक शस्त्राच्या मदतीने त्याने पत्नी मनीषावर वार करून खून करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरक्षक संजय देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के, संजय मदने यांनी घटनास्थळ भेट देऊन आरोपीला शोधण्यासाठी तात्काळ विशेष पथक तयार करून फरार संशयित आरोपी ज्ञानेश्वर प्रव्हाणेला अटक केली असून आहे. मृत्यूदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे.

मृत महिलेच्या वडील कैलास सूर्यनारायण नवगिरे (रा.चांगतपुरी ता.पैठण) यांनी या घटनेची फिर्याद पैठण पोलिसांनी दिली. या फिर्यादीवरुन प्रव्हाणे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सपोनि सिद्धेश्वर गोरे हे करीत आहे.

SCROLL FOR NEXT