मद्यधुंद जेसीबी चालकाने चिमुकल्याला चिरडले file photo
छत्रपती संभाजीनगर

मद्यधुंद जेसीबी चालकाने चिमुकल्याला चिरडले

गल्लीत खेळत असलेल्या ९ वर्षीय चिमुकल्याला भरधाव जेसीबीने चिरडल्याची घटना रविवारी (दि.८) सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील महालक्ष्मी कॉलनीत घडली.

पुढारी वृत्तसेवा

Drunk JCB driver crushes minor child

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गल्लीत खेळत असलेल्या ९ वर्षीय चिमुकल्याला भरधाव जेसीबीने चिरडल्याची घटना रविवारी (दि.८) सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील महालक्ष्मी कॉलनीत घडली. या अपघातात रुद्र जितेंद्र पाटील (९) हा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेतील जेसीबी चालकाला पकडून सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुद्र आपल्या घरासमोरील गल्लीत खेळत होता. त्याचवेळी अचानक आलेल्या जेसीबीने त्याला धडक दिली. जेसीबीचे चाक रुद्रच्या छातीवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, जेसीबी चालक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता.

अपघातानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र महालक्ष्मी कॉलनीतील नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला. त्यानंतर काही वेळात सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले. घटनेनंतर गंभीर जखमी रुद्रला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असून, रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT